Class First To Nine Annual Examination Time Table

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी; वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर!

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ.१ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन /PAT चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करणेबाबत

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गांच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. 

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, यासाठी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी संदर्भीय पत्राद्वारे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षा/संकलित चाचणी २ व नियताकालीक मूल्यांकन (PAT) सन २०२४ २५ साठी वेळापत्रक जाहिर केले आहे.

राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार दिनांक ८ ते २५ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी २ या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला.

सदरचे वेळापत्रक विहित मुदतीत आपल्या अधिनस्थ क्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास आणून देऊन वेळापत्रकाप्रमाणे परीक्षांचे आयोजन होईल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही व नियोजन करावे. अपवादात्मक अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन वरील नियोजनात बदल करावयाचे असल्यास शिक्षणाधिकारी यांनी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांची परवानगी घेवूनच बदल करावा

वेळापत्रक डाऊनलोड करा 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

संकलित चाचणी 

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad