शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया
शिक्षक प्रोफाइल अपडेट करणे
अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादित असल्यामुळे सर्व शिक्षकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी
मुदतवाढ
शिक्षकांना प्रोफाइल ACCEPT करण्यासाठी दिनांक १७/३/२०२५ पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे
शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2025
मार्गदर्शन व्हिडिओ पहा
➤ शिक्षकांसाठी सूचना क्र.2
🔹 प्रोफाइल मधील माहीती दुरुस्त करणे
आपली प्रोफाईल माहिती मध्ये एखादी दुरुस्ती करावयाचे असल्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
बदली पोर्टल लिंक
▪️आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर टच करा.
▪️आलेला OTP टाका व Captcha टाकून लॉगीन करा.
▪️Login केल्यानंतर OTP मोबाईल तसेच Email वर येतो.
▪️बदली पोर्टलवर लॉगीन झाल्यावर वरील डाव्या कोपर्यात तीन आडव्या रेषांवर टच करून Profile वर टच करा.
▪️आपली माहिती तपासून बघा.
▪️सर्व माहिती तपासून पहा.
▪️जी माहिती बदलायची आहे तेथे हिरव्या वर्तुळातील ✔️या चिन्हावर क्लिक करा. ❌असे चिन्ह दिसताच माहिती edit करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे दिसून येईल.
▪️आता आपली माहिती अचूक नोंदवा.
▪️खाली Save बटनावर क्लिक करा.
▪️आता Next बटनावर क्लिक करावे. या पानावर आपली सर्व माहिती Preview मध्ये दिसेल, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यास व प्रशासना कडून माहिती मिळताच Submit करावे
बदली पोर्टल प्रोफाइल बाबत महत्वाचे
(सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या)
➤ बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने प्रोफाईल पडताळून पाहणे आवश्यक आहे.आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
➤ माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
➤ लॉग इन पहिल्या वेळी केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत आणि Accept करा.
➤ वर डाव्या बाजूला मेनू बार आहे ( आडव्या लाईन्स) त्यात Profile पर्याय आहे तिथे प्रोफाइल दिसते.त्यावर Click करा.
➤ Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.
➤ Personal Details मधील सर्व माहिती तपासून घ्या अचूक असल्याची खात्री करा.* यासाठी शक्य होत असल्यास तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
✅First Name
✅Middle Name
✅Last Name
✅Date Of Birth
✅Gender
✅Mobile Number (लॉग इन आयडी,लॉग इन OTP येतो)
✅Adhar (चुकला असला तरी दुरुस्ती होणार नाही,बदली प्रक्रियेवर काहीही परिणाम होणार नाही)
✅PAN
✅E-Mail (फॉर्म ची PDF, OTP येतो)
✅SHALARTH ID
✅Marital Status
महिलांना संवर्ग एक साठी यातील अचूक नोंद अत्यावश्यक आहे)
Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक असल्याची खात्री करावी* यासाठी शक्य होत असल्यास तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
➤ Date of Apponitment in ZP-सेवेत प्रथम रुजू दिनांक.
➤ Cast category – जातीचा संवर्ग
➤ Appointment Category- निवडीचा प्रवर्ग
➤ Current District Joining Date- सध्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांक
➤ Udise Code of Current School- कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा.
➤ Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
➤ Current Teacher Type - Graduate पदवीधर/विषय शिक्षक/Under Graduate प्राथमिक शिक्षक/ Headmaster मुख्याध्यापक
➤ Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांच्या साठी भाषा Language/ गणित-विज्ञान Maths Science/ समाजशास्त्र Social Science यापैकी जे असेल ते इतरांनी Not Applicable NA हे ऑप्शन राहील.
Teaching MEDIUM- यामध्ये आपल्या शाळेचे मेडियम असेल
Last Transfer Category – सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग...
1. Cadre 1 संवर्ग 1
2. Cadre 2 संवर्ग 2
3. Entitle संवर्ग 3 बदली अधिकार प्राप्त शिक्षक
4. Eligible संवर्ग 4 बदली पात्र शिक्षक
5. NA- NOT APPLICABLE
हे मागील बदली कशी झाली याबाबत आहे
➤ Last Transfer TYPE- सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा INTER DISTRICT की जिल्हांतर्गत INTRA DISTRIC बदली होवून आलात तो प्रकार असेल.या पेक्षा वेगळे असेल तर N/A NOT APPLICABLE. *हे मागील बदली कशी झाली याबाबत आहे.
➤ Current Area Joining Date- सध्या आपण सर्वसाधारण किंवा अवघड क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात रुजू दिनांक.
➤ Have You Worked Continuosly In Non Difficult Area For 10 Years-
आपली सुगम क्षेत्रात सतत सेवा 10 वर्ष झाली आहे का....
➤ Have You Been Suspended in last 10 Years- शेवटच्या 10 वर्षात आपण निलंबित झाले आहेत का...
आपली प्रतिक्रिया व सूचना