बदली पोर्टलवरील सध्याच्या वेळापत्रकानुसार कार्यवाही पद्धती
शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2025
Phase-1 मधील टप्पे
(OTT पोर्टलवरील सध्याच्या वेळापत्रकानुसार)
➤ पहिला टप्पा-
सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.
कालावधी- दिनांक 02 मार्च ते 14 मार्च
➤ दुसरा टप्पा-
गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.
कालावधी-02 मार्च ते 09 मार्च
➤ तिसरा टप्पा-
गटशिक्षणाधिकारी यांनी Verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे
कालावधी- 02 मार्च ते 09 मार्च
➤ चौथा टप्पा-
शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांचे शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.
कालावधी-02 मार्च ते 09 मार्च
➤ पाचवा टप्पा-
गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे. शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत
कालावधी-02 मार्च ते 09 मार्च
➤ सहावा टप्पा-
जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, अशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence) Accept करतील.
कालावधी-10 मार्च ते 10 मार्च
➤ सातवा टप्पा-
वरील 6 टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence 100 % पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social Appeal करता येईल.
कालावधी- दिनांक 11 मार्च ते 11 मार्च
➤ आठवा टप्पा-
शिक्षकांनी केलेल्या Social Appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.
कालावधी- दिनांक 12 मार्च ते 13 मार्च
आपली प्रतिक्रिया व सूचना