Big News Change Time Table Annual Examination

पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलणार ?

राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा दिनांक 08 एप्रिल 2025 पासून सुरू झाल्या आहेत आणि परीक्षा सुरू झाल्याबरोबर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या परीक्षांच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीने एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे. विशेषता विदर्भात आणि मराठवाड्यात तापमानामुळे अंगाची अक्षरशा लाहिलाही होत आहे.

दरम्यान या कडक अन तीव्र उन्हात शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. असह्य उन्हात शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असल्याने पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.

• विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४४ अंश सेल्सियसचा टप्पा पार केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला तातडीने परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा हस्तक्षेप केला असून याचा परिणाम म्हणून शालेय प्रशासन आणि पालकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

• परीक्षा दिनांक १५ एप्रिलच्या आत घेण्याचे निर्देश

शिक्षण विभागाने याआधी एकसंध राज्यव्यापी वेळापत्रक लागू केल्यामुळे विदर्भातील परीक्षांचा कालावधी वाढला होता. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आणि स्थानिक शाळांनी याविरोधात आवाज उठवला.

आता न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षा दिनांक १५ एप्रिलच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार प्रशासन हालचाली सुरू सुद्धा झाल्या आहेत.

 यामुळे आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठीचे सुधारित वेळापत्रक कसे असणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार असेल.

• आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत…

खरेतर, राज्यातील १ कोटी ४५ लाख विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होत आहेत. यंदा नववीसाठी प्रथमच लागू करण्यात आलेली नियतकालिक मूल्यांकन पद्धतीदेखील शिक्षण व्यवस्थेत नवे परिवर्तन घडवून आणत आहे. दरम्यान आता विदर्भात उष्णतेच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या परीणामाला आळा बसावा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात परीक्षा देता याव्यात, त्यांना तीव्र उन्हाचा फटका बसू नये, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत या उद्देशाने हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत.

निपुण महाराष्ट्र

PAT उत्तर सूची

वार्षिक परीक्षा 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad