इयत्ता ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची
माहिती ! जाणून घ्या
Maharashtra FYJC Admission 2025 :- दिनांक १९ मे, २०२५ रोजी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांचेसाठी सराव करणेकरीता पोर्टल सुरु करण्यात आले होते.
सराव करतेवेळी राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदरील सूचनांचा अंतरभाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करणेबाबत सूचित केले आहे.
इयत्ता ११ वी प्रवेश पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा सोमवार, दिनांक २६ मे २०२५ सकाळी ११.०० पासून सुरू होत आहे.
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया - ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची माहिती
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणी करणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन प्रवेश नोंदणीची प्रक्रिया उद्या 3 वाजता पासून सुरू होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खालील शासकीय प्रवेश वेबसाइटला भेट देऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे:
https://mahafyjcadmissions.in
आपल्या सोयीनुसार, आपण आपल्या जवळच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया
(11th FYJC Admission Registration Process):
१. वेबसाइटला भेट द्या:
सर्वप्रथम, आपल्या वेब ब्राउझरमध्ये अधिकृत वेबसाइट उघडा:
यानंतर, तुम्हाला तुमचे सध्याचे राहण्याचे ठिकाण (तालुका) निवडायचे आहे.
२. नवीन विद्यार्थी नोंदणी:
वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूकपणे भरावी लागेल.
त्यानंतर, तुमच्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा सीट नंबर, उत्तीर्ण होण्याची वर्ष आणि शिक्षण मंडळाची (बोर्ड) माहिती प्रविष्ट करा.
यानंतर तुम्हाला काही आवश्यक प्रश्न विचारले जातील, त्यांची योग्य उत्तरे द्या. शेवटी, एक सुरक्षित पासवर्ड तयार करून तुमची नोंदणी पूर्ण करा.
३. लॉग इन आयडी तयार:
नोंदणी प्रक्रिया यशस्वी झाल्यावर, तुम्हाला तुमचा युनिक लॉग इन आयडी (Login ID) आणि ॲप्लिकेशन नंबर (Application Number) मिळेल. हा नंबर जपून ठेवा. पुढील सर्व प्रक्रियेसाठी तो महत्त्वाचा असेल.
४. फॉर्म १ भरा (11th Admission Form 1):
आता तुम्हाला वेबसाइटच्या डॅशबोर्डवर लॉग इन करण्यासाठी तुमचा लॉग इन आयडी आणि तयार केलेला पासवर्ड वापरावा लागेल.
लॉग इन केल्यावर, तुम्हाला काही आवश्यक माहिती विचारली जाईल, जसे की तुमचा पूर्ण पत्ता, पालकांचे संपर्क क्रमांक आणि त्यांचा व्यवसाय इत्यादी. ही माहिती काळजीपूर्वक भरा.
यानंतर, तुम्हाला तुमची जात प्रवर्ग निवडायचा आहे (SC/ST/OBC/EWS/OPEN).
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
पुढील टप्प्यात, तुम्हाला खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील:
* इयत्ता दहावीची गुणपत्रिका (Marksheet)
* रहिवासी पुरावा (Domicile Certificate / Address Proof)
* जातीचा दाखला (Caste Certificate, जर लागू असेल तर)
* पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
शक्य असल्यास, आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला (Transfer Certificate) देखील अपलोड करा.
६. नोंदणी शुल्क भरा:
यानंतर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी शुल्क भरावे लागेल. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून हे शुल्क भरू शकता.
७. फॉर्म २ भरा:
फॉर्म १ भरून झाल्यावर तो लॉक करा.
यानंतर, पुन्हा एकदा लॉग इन करून तुमचे सध्याचे राहण्याचे ठिकाण (तालुका) निवडा.
आता तुम्हाला तुमच्या आवडत्या महाविद्यालयांची (कॉलेज) यादी विचारली जाईल. तुम्हाला ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांची प्राथमिकतानुसार यादी तयार करून प्रविष्ट करा.
सर्व महाविद्यालयांची निवड झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
८. गुणवत्ता यादी (Merit List):
प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर केली जाईल. साधारणपणे, ३ ते ४ गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
ज्या महाविद्यालयात तुमचा गुणवत्तानुसार प्रवेश निश्चित होईल, त्याचे नाव तुम्हाला दिसेल. जर पहिल्या गुणवत्ता यादीत तुम्हाला तुमच्या पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले, तर तुम्हाला तिथे प्रवेश घेणे अनिवार्य असेल.
जर तुम्हाला पहिल्या गुणवत्ता यादीत मिळालेले महाविद्यालय तुमच्या पसंतीचे नसेल, तर पुढील गुणवत्ता याद्यांसाठी तुम्ही पुन्हा अर्ज भरू शकता.
Maharashtra FYJC CAP 2025 साठी प्रमुख तारखा
➤ सराव नोंदणी: 19 मे –21 मे
➤ नोंदणीसाठी वेळ: 26 मे ते 03 जुन 2025
➤ तात्पुरती गुणवत्ता यादी: 05 जून 2025
➤ तक्रारी आणि सुधारणांसाठी वेळ: 06 जून व 07 जून 2025
➤ अंतिम गुणवत्ता यादी: 08 जून 2025
➤ गुणवत्तेवर आधारित प्रवेश वाटप: 09 जून ते 11 जून 2025
➤ नियुक्त केलेल्या महाविद्यालयांची यादी: 09
अधिकृत संकेतस्थळ - https://mahafyjcadmissions.in
ई-मेल आयडी - support@mahafyjcadmissions.in
हेल्पलाईन नंबर - ८५३०९५५५६४.
सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी शुभेच्छा!
यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक १ चे सविस्तर दिनांक १९ मे २०२५ ते १३ जून २०२५ दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबींच्या दिनांक जाहीर केल्या होत्या.
दिनांक २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी यापुढे विद्यार्थी हित लक्षात घेता व तोंत्रिक बाबींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, या बाबी लक्षात घेता इ.११ वी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक दिनांक २६ मे,२०२५ सकाळी ११.०० वाजता फेरी क्रमांक १ बाबतचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल.
पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल.
प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल. कोणतीही छोटयात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाव्दारे कळविण्यात येईल. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.
What's Up Group Join
➤ What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना