दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर !
कोकण बोर्ड राज्यात अव्वल
SSC Result 2025 :- दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल ?
SSC EXAMINATION FEBRUARY Maharashtra Board RESULT
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 94.10 टक्के निकाल लागला आहे. बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेतही यंदा नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. यंदा राज्यात 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.31 इतकी आहे.
यंदा 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहे. लातूर जिल्ह्यात एकूण 113 जणांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण 9 विभागांमध्ये 285 विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 35 टक्के मिळाले आहेत. 35 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के ?
- कोकण - 98.82 टक्के
- कोल्हापूर - 96.78 टक्के
- मुंबई - 95.84 टक्के
- पुणे - 94.81 टक्के
- नाशिक - 93.04 टक्के
- अमरावती - 92.95 टक्के
- संभाजीनगर - 92.82 टक्के
- लातूर - 92.77 टक्के
- नागपूर - 90.78 टक्के
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दहावीचा निकाल नेमका कुठे पाहाल ?
जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
What's Up Group Join
➤ What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना