SSC Maharashtra Board Examination Result Announce

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची 

बातमी ! दहावीचा निकाल आज जाहीर 

होणार !!आपला निकाल पहा 

Maharashtra Board Exam SSC Result 2025 :-  आता प्रतिक्षा संपली आहे उद्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल जाहीर होणार आहे 

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

राज्याचा निकाल - 94.10%
कोकण बोर्ड राज्यात अव्वल (98.82%)
नागपूर विभाग सर्वात कमी निकाल(90.78%)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
आपला निकाल येथे पहा 
अधिकृत Website पुढीलप्रमाणे आहेत.

➤ 1 ) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 2) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 3) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 4) खालील लिंक वर क्लिक करा 

 ➤ 5) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 6) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 7) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 8) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 9) खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 10) खालील लिंक वर क्लिक करा 

SSC EXAMINATION FEBRUARY - 2025 RESULT
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

मंडळाने निकालासोबत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:
१) ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकांची झेरॉक्स कॉपी (photocopy) हवी आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, ज्यांना पेपर पुन्हा तपासायचा आहे, म्हणजेच पुनर्मूल्यांकन करायचे आहे, ते देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. "ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे." गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे २०२५ आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking चा वापर करून शुल्क भरता येईल.
२) उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एक अट आहे. "फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील." म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा तपासण्याची इच्छा आहे, त्यांना आधी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घ्यावी लागेल. ती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
३) जे विद्यार्थी सर्व विषयात पास झाले आहेत, त्यांच्यासाठी गुण सुधारण्याची संधी आहे. "फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु.-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील." याचा अर्थ, जे विद्यार्थी आपले गुण वाढवू इच्छितात, ते पुढील तीन परीक्षांमध्ये (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६) पुन्हा परीक्षा देऊ शकतात.

४) ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे २०२५ पासून सुरु होईल. "जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत." या परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतं, याबद्दलची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad