Big News HSC And SSC Maharashtra Board Exam Date Announced

मोठी बातमी ! इ.10 वी आणि 12 वी 

बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

यंदा परीक्षा 2 आठवडे आधी होणार

🔸 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावर्षी शिक्षण मंडळाने परीक्षा नेहमीच्या वेळेपेक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आणि त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

🔸 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जातात. 

लेखी परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

इयत्ता 12 वी (HSC) बोर्ड परीक्षा : 

दिनांक 10 फेब्रुवारी 2026 (मंगळवार) ते दिनांक 18 मार्च 2026 (बुधवार) या कालावधीत संपन्न होईल (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह).

इयत्ता 10 वी (SSC) बोर्ड परीक्षा :

 दिनांक 20 फेब्रुवारी 2026 (शुक्रवार) ते दिनांक 18 मार्च 2026 (बुधवार) या कालावधीत घेण्यात येईल.

🔸 लेखी परीक्षांच्या आधीच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे:

- 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : 23 जानेवारी 2026 (शुक्रवार) ते 9 फेब्रुवारी 2026 (सोमवार) या दरम्यान होतील. यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे.

- 10 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : 2 फेब्रुवारी 2026 (सोमवार) ते 18 फेब्रुवारी 2026 (बुधवार) या दरम्यान होतील (यात शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा समावेश आहे).

अभ्यासकम प्रात्यक्षिक परीक्षा

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.

🔸 मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने या तारखांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.