Teachers And Officers Employees Various Events All Information

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी 

यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन 

होणार ! शासन परिपत्रक निर्गमित 


शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत

संदर्भ:

१. राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२०.

२. राज्य अभ्यासक्रम आराखडा- २०२४.

३. शासननिर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय, मुंबई दि. १५ मार्च २०२४ (SQAAF)

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, DIET मधील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.


या स्पर्धांच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ह्या एकूण ४२ विषयांवर आधारित असणार आहेत. नमूद स्पर्धांचे निकष व नियमावली बाबतची सविस्तर माहिती शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी सदर पुस्तिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर उपयुक्त या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा नियोजन सोबत जोडले आहे.

शासन परिपत्रक डाऊनलोड करा 
➤ खालील लिंक वर क्लिक करा 

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.