Sanch Manyata New notification Announced

संचमान्यता सन २०२५-२६ बाबत ! 

नवीन अधिसूचना जाहीर 

१) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२) मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना उद्देशून केलेले निवेदन जा.क्र. २२७५/२०२५

३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा /२०२५/टि-८/व्हीआयपी/ई-२२८३१२०, दि.०३.१०.२०२५

उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाकीत मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी यु-डायस प्लस मध्ये शिक्षक/शिक्षकेतर संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थी पट ग्राह्य धरण्याच्या तारखेस मुदतवाढ मिळण्याबाबत मार्गदर्शनपर आदेश होण्याबाबत विनंती सदंर्भ क्र. ३ अन्वये प्राप्त झाली आहे.

२. त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येत आहे की, चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी संच मान्यता निर्धारणासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी. तथापि, सदर सवलत ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी लागू असेल.

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी : आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.