Ads Area

Class Four And Class Seven Scholarship Exam Syllabus And All Information

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2025-26 च्या पूर्व तयारीबाबत...


संदर्भ : शासन निर्णय क्र. प्राउशि/प्र.क्र.23/2025 (ई-1142170)/एस.डी.-5, दि. 17/10/2025.

उपरोक्त विषय व संदर्भीय शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इ. 5 वी ऐवजी इ. 4 थी व इ. 8 ऐवजी इ. 7 वी असा करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार सन 2025-26 या शैक्षणिक सत्राम इ. 4 थी, इ. 5 वी, इ. 7 वी व इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.

इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली असून इ. 4 थी इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम, अधिसूचना व इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परिषदेन संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. 
त्याअनुषंगाने इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळा पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची व विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये (इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरुन संकलित करण्यास आपल्या स्तरावरुन कळवावे,

सदर माहिती भरलेली प्रपत्रे शाळेतच ठेवावी, जेणेकरुन सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिध्द होऊन ऑनलाईन लिक उपलब्ध होताच आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे सुलभ, जलद व बिनचुक होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अभ्यासक्रम


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad