शिष्यवृती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी आवेदन भरण्याकरिता मुदतवाढ ! संपूर्ण माहिती
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 08 फेब्रुवारी, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/5221, दि. 27/10/2025.
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दिनांक 22 फेब्रुवारी, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 27 ऑक्टोबर ते 08 डिसेंबर, 2025 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक 15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक 15 डिसेंबर, 2025
अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना