MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता
परीक्षा जून 2026 नवीन तारीख बाबत
खुलासा ! MSCE PUNE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ चे आयोजन केले होते. या कार्यालयाचे जा.क्र./मरापप/स्वि. सहा/२०२६/२२१, दिनांक २७ जून २०२६ रोजी जाहीर केलेल्या जाहीर प्रकटनानुसार दिनांक २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
तथापि, शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्यावत परीक्षेची दिनांक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेले नाही. तरी कोणत्याही सोशल मिडीयाच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. सदर परीक्षा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या.
तथापि, आज दिनांक २७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना