Ads Area

MAHATET Exam Online New Update MSCE PUNE

MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता 

परीक्षा 2026 ! आता ऑनलाइन होणार 

!! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 

मा. व्यवस्थापन IBPS संस्था मुंबई 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करणेबाबत.

संदर्भ:- १. या कार्यालयाचे प्रसिध्द निवेदन दिनांक १५/०५/२०२६

२. या कार्यालयाचे जाहिर प्रकटन दिनांक २७/०६/२०२६

३. या कार्यालयाचा दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा मेल.

उपरोक्त संदर्भीय क्र. १ अन्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ चे आयोजन दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये पेपर क्र. १ एकूण २५८०६१ व पेपर क्र. २ एकूण - ३४२०६४ असे एकूण ६००१२५ परीक्षार्थीनी परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र (फॉर्म) भरले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये पेपर क्र. १७०१ व पेपर क्र. २१०२८ असे एकूण १७२९ परीक्षा केंद्र निश्चित केलेले होते. परीक्षा केंद्रांवर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

तथापि उपरोक्त या कार्यालचे संदर्भ क्र. (२) जाहिर प्रकटनाद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -२०२६ चे आयोजन दि. २८/०६/२०२६ रोजी न घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी सदर परीक्षा घेणेकरीता उपरोक्त संदर्भिय मेल (३) अन्वये परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने घेणेबाबत आपणास अवगत करण्यात आले होते.

दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र. १३८५/२०२५ तसेच अन्य संबंधित याचिकांवर दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सन २०२८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सबब सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान दोनदा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धची अवलंब करुन घ्यावयाच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२६ चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेणेकरीता विनंती करण्यात येत आहे

खालील लिंक वर क्लिक करा 

📲 Join WhatsApp Group 

 खालील लिंक वर क्लिक करा 

📲 Join WhatsApp Group


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad