इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा
अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर!
MSCE Pune
पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 22 फेब्रुवारी, 2026
अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 22 फेब्रुवारी, 2026 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या गुरूवार दि. 02 जुलै, 2026 रोजी सायं 05.00 वाजता परिषदेच्या https://mscepune.in व https://2026.puppssmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
१. सर्व विद्यार्थ्यांचे रंगीत गुणपत्रक वैयक्तिक व एकत्रित स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
२. केवळ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरल्यानंतरच रंगीत प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
३. विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत अथवा उत्तेजनार्थ गुणवत्ता यादीत आला असल्यास त्याचे प्रमाणपत्र डाव्या बाजूस दिलेल्या अंतिम निकाला अंतर्गत DIGITAL CERTIFICATES या पर्यायावर क्लिक करून डाऊनलोड करता येईल.
४. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती तात्काळ भरण्यात यावी. सदर माहिती अभावी विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती रक्कम न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकांची राहील.
५. CBSE, ICSE & Other अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेअंतर्गत राज्य गुणवत्त्ता यादी अथवा जिल्हा गुणवत्त्ता यादीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जात नसल्याने त्यांना बँक खात्याची माहिती भरण्याची आवश्यकता नाही.
६. सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आपणास डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ते तात्काळ डाउनलोड करून उच्च प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई करून विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच सर्व प्रमाणपत्र व गुणपत्रकांच्या PDF आपल्या दप्तरी जतन करून ठेवाव्यात.
दि. 22 फेब्रुवारी, 2026 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 18/05/2026 रोजी जाहीर करण्यात आला होता.
दिनांक 18/05/2026 ते 27/05/2026 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे.



आपली प्रतिक्रिया व सूचना