Google Tricks

Google Tricks

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे
जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला पाहिजे ती माहिती लवकर मिळत नाही, अनेक वेबसाईटवर शोधत असावे लागते. नेमके माहिती लवकर मिळत नाही मग काय करावे, अशा प्रश्र आपल्या पडत असेल तर हि पोस्ट त्याकरिता आहे.
*​गुगलवर पाहिजे ते सापडत नाही? वापरा या 10 गुगल ट्रिक्स!*. Google Tricks

अनेकदा आपल्याला पाहिजे ती सर्च रिझल्ट गुगलवर मिळत नाही. आपल्याला मग ते गाणी फोटो,असो  विशिष्ट माहिती
Google वर सर्च करताना आपल्याला हजारो पेक्षा रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी अनेक वेबसाईटवर आपणास नेमके माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि मग अशावेळी प्रत्येक वेबसाईट उघडून पाहावे लागते 
याचवेळा निरनिराळ्या प्रकारची विशेष माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला पाहिजे ते माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी मग आपल्याला  कंटाळा येऊन काम होत नाही.
Google Tricks
https://pixabay.com


आता आपण  आपली माहिती शोधण्याची योग्य पद्धत वापरली तर योग्य ती माहिती लवकरच शोधायला गुगल आपल्याला योग्य मदत करेल आणि यामुळे वेळही वाचतो व आपले काम लवकर पूर्ण होईल

गुगलवर माहिती शोधताना काही चिन्हे,इंटरेस्टिंग ट्रिक्स अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो व गुगल लवकर आपल्याला हवी ती माहिती  लवकर त्याचा रिझल्ट आपल्यासमोर.

💥 1. गुगल सर्च  ' + ' चिन्हाचा वापर करावा :

 आपल्याला जर मोबाईल संबंधित माहिती गुगलवर आपणास मोबाईलची कंपनी (उदा: विन्डोज 10 चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ' Windows10 + History ' असे सर्च केल्यास गुगलवर हे दोन्ही शब्द असलेलीच पेज आपल्याला
दिसेल

💥 2. गुगल सर्च  ' - ' चिन्हाचा वापर करावा : 

आपल्याला एखादेच नाव Google वर  शोधायची असेल तर आपल्याला काही ठराविक चिन्ह वापरावे लागते
 जर आपणास गुगलवर 'Virat' असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये 'virat Kohali' च्या माहितीची पेज सहाजिक जास्त असतील. आपल्याला गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, म्हणजे Kohali हा शब्द पाहिजे नाही तर 'Virat' -Kohali' असे  नाव गुगल वर सर्च करावे.  मग गुगल आपल्याला योग्य तो निर्णय देईल  'Kohali'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची नाव दिसेल

💥 3. गुगल सर्च ' ~ ' चिन्हाचा वापर

आपल्याला गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या पेजला त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पेज देखील गुगल दाखवितो.

💥 4. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधणे

: सध्या खुप मोठा प्रमाणावर वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास तेव्हा Google ची सेवा चांगले आहे
 गुगलवर एखाद्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती सर्च केली तर गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून  देतो.

उदा. ' www.Whatsupweb.com mobile ' असे दिल्यास गुगल फक्त www.Whatsupweb.com वर mobile हा शब्द शोधेल.

💥 5.  शब्दाचा अर्थ शोधणे

 अभ्यास  करताना व काम करताना जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ पाहिजे असल्यास गुगल वर सर्च करताना त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास गुगल त्या शब्दाचे अर्थ व माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. 'Define: Hard Disk ' असे शोधल्यास गुगल ' Hard Disk ' या शब्दाचा अर्थ असणारे वेबसाईटची योग्य यादी आपल्याला दिसेल.

💥 6. सारखी वेबसाईट शोधणे

: जेव्हा आपण गुगल वर सर्च करताना एखादी वेळेस असे होते की, आपणास एखादी वेबसाईट त्यावरील माहिती खुप छान आणि आपल्या उपयोगी असलेली पोस्ट  आवडते. पण त्या सदर  वेबसाईट प्रमाणेच दुसरी  त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत हे शोधण्यासाठी ' related: ' या शब्दाचा वापर करावा. उदा. ' related:http://www.gmail.com/ ' असे शोधल्यास गुगल आपल्याला खालीलप्रमाणे आहेत
 'www.gmail.com ' प्रमाणेच  माहिती असणार्या वेबसाईटची यादी देईल.

💥 7. जसाच्या तसा शब्द शोधणे

आपल्याला सारखे शब्द पाहिजे असेल तर हे टिप्स वापरावे
 आपल्याला एखादा शब्द गुगलवर सारखा व जसाच्यातसा सर्च करत असताना त्या शब्दांच्या दोन्ही बाजूला अवतरण चिन्हाचा वापर (Double Inverted Commas) म्हणजेच " " याचा वापर करावा. 
 गुगलवर "About us" असे सर्च केल्यास गुगल आपल्याला ज्या पेज वर हे दोन्ही शब्द एकत्र असतील तोच पेजची वेबसाईट  समोर येईल. अशाप्रकारे गुगल आपल्याला योग्य ती माहिती देईल.

💥 8. गुगल सर्च ' * ' चिन्हाचा वापर करावा :

आपल्याला एखाद्या विशिष्ट शब्दांच्या संबंधित शब्द व माहिती पाहिजे असेल तर
हि टिप्स वापरावे.
 गुगलवर आपण एखादा शब्द शोधतो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर 'friend* ' असे सर्च केल्यास friend या शब्दात संबंधित तसेच शब्दासोबत friends, friendship त्या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखील गुगल पेजवर आपल्याला दिसेल.

💥 9. गुगल सर्च' ? ' चिन्हाचा वापर करावा : 

आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा
एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास त्या शब्दाची स्पेलिंग पाहिजे असल्यास गुगलवर ' ? ' चिन्हाचा वापर करावा.
 उदा. 'fri??d' असे सर्च केल्यास गुगल
आपल्याला त्या शब्दांत असलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती स्पेलिंग घेऊन त्या माहितीची पेज आपल्या समोर दिसेल

💥 10. गुगल सर्च  ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा : 

 आपल्याला एखादे वेळी दोन शब्द पाहिजे असेल तर
आपल्याला दोन शब्दांना मिळून एकत्र गुगल सर्च करायचे असते तेव्हा 'AND अथवा O ' शब्दाचा वापर करावा.
 उदा. जर गुगल सर्च करताना ' Mobile or Laptop केल्यास गुगल ज्या पेज वर  दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पेज सर्च करतो.
आपल्याला मग योग्य तो सर्च करुन देतो
. जर दोन्ही शब्द पाहिजे असेल तर  
 ' AND ' शब्दाचा वापर दोन्ही शब्दांत केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच वेबसाईट पेज आपल्याला दाखवितो.
आपल्याला दोन्ही शब्दाची माहीती मिळेल
  यामुळे आपले काम लवकर होईल.

      वरील सर्व TIPS प्रत्येक google searcher ला खुप उपयोगी व कामाचे आहेत.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad