Education Week Activity Third Day Sports Day

शिक्षण सप्ताह उपक्रम

दिवस तिसरा क्रीडा दिन

शासन परिपत्रक नुसार शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे,

त्या अनुषंगाने सर्व उपक्रमाची माहिती देण्यात येत आहे

बुधवार दिनांक 24 जुलै, 2024

परिशिष्ट-३

शिक्षा सप्ताहः शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा बुधवार दिनांक २४ जुलै २०२४ क्रीडा दिन

नवीन राष्ट्रीय धोरण (INEP 2020) गध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय थोरणारा स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. या खेळांच्या गाध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व शाक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.

➤ उद्दिष्ट्ये:- 

विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनचे खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-

१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वावद्दल जागरुकता वाढविणे.

२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.

३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.

४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे

५. खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे,

६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषत भारताचे स्वदेशी खेळ)

७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्गक वृत्ती विकसित करणे

८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.

९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यामध्ये सांघिक भावना वाढवणे.

१०. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.

शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्याये असे आहे. या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

      मार्गदर्शक सूचना

> शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.

> इयत्ता १ ली ते ५ वी साठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अश्या प्रकारचे खेळ घ्यावेत.

> इयत्ता ६ वी ते १२ वी साठी बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत

> तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी.

> शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.

> स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी.

> पालक आणि समाज संस्था यांचे मदत घेण्यात यावी.

> सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.

➤ अपेक्षित परिणामः-

विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.

वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.

क्रीडा शपथ डाऊनलोड करा 

उपक्रम फोटो, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी Mobile Desktop Site करावे 

➤ प्रथम खालील लिंक वर क्लिक करा

नवीन नवीन Update 

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad