Learning from home
गटसाधन केंद्र धामणगांव रेल्वे अभिनव उपक्रम
तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांकरिता विविध माध्यमातून अध्ययन पूर्ण करीत आहे.
शाळा बंद पण शिक्षण सुरू या तत्वावर
धामणगांव रेल्वे पंचायत समितीचे मा.गटशिक्षणाधिकारी सौ सुषमाताई मेटकर यांनी शाळा बंद पण शिक्षण सुरु या तत्त्वावर आम्हाला प्रेरणादायी मार्गदर्शन केल्यानंतर धामणगांव रेल्वे तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक
श्री डि जे राठोड, श्री. विजय ब्राम्हण, श्री. अमोल पोकळे, श्री. पवन बोके व सर्व विषय तज्ञ गट साधन केंद्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दैनिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन .
दररोज विद्यार्थी करिता गुगल फॉर्म मार्फत ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात येत आहे , ते सर्व शैक्षणिक ग्रृपला व पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठविण्यात येत आहे , त्यामुळे तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थी Google Form ची ऑनलाईन टेस्ट सोडवीत आहे तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट सोडविण्याकरिता मदत झाली तसेच Los Smart Q चा वापर, DIKSHA APP वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य सुरू केले आहे
विद्यार्थी आता लाॅकडाऊन कालावधीमध्ये Google Form , Los Smart Q व अभ्यासमाला दीक्षा ॲप घरीच बसून कोणाचीही मदत न घेता आपले अभ्यास पूर्ण करीत आहे. हे करताना विद्यार्थ्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे, एक नवीन प्रकारची तंत्रज्ञान आपण अवगत केले आहे विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त करीत आहे.
तसेच मा. केंद्र प्रमुख केंद्र जुना धामणगाव श्री.दिलीप चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाने
तंत्रस्नेही शिक्षक श्री डि जे राठोड यांनी नवीन नवीन वेबसाईट तयार करून व तंत्रज्ञानाचा सहकार्याने केंद्र जुना धामणगाव पेपरलेस करण्यात आले आहे, वरिष्ठ कार्यालय स्तरावरील कोणताही अहवाल कागदावर न देता ,
Google Form मार्फत केंद्र संकलन करण्यात येत आहे, याकरिता केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सहकार्य करीत आहे, या नवीन उपक्रमामुळे संपर्क टाळण्याकरिता मदत होत आहे,
तसेच मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अहवालात गुंतून न राहता शैक्षणिक गुणवत्ता विकासाकरिता फायदेशीर ठरत आहे, या प्रेरणेतून तालुक्यातील इतर केंद्राचे केंद्र प्रमुख आपल्या केंद्रात सदर उपक्रम राबविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. सदर अभिनव उपक्रमाची कौतुक होत आहे
तसेच मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अहवालात गुंतून न राहता शैक्षणिक गुणवत्ता विकासाकरिता फायदेशीर ठरत आहे, या प्रेरणेतून तालुक्यातील इतर केंद्राचे केंद्र प्रमुख आपल्या केंद्रात सदर उपक्रम राबविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. सदर अभिनव उपक्रमाची कौतुक होत आहे



आपली प्रतिक्रिया व सूचना