Inspire awards Apply
इंस्पायर अवॉर्ड
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
दरवर्षी नुसार आपण आपल्या विद्यार्थ्यांचे इंस्पायर अवॉर्ड फार्म भरतो यावर्षी सुद्धा आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे
इंस्पायर अवॉर्ड मानक* . त्याचा मुख्य उद्देश ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष)
प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे.
Inspire award कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात
. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या
वेब पोर्टल E- MIAS च्या खालील वेबसाईटला क्लिक करा
http://www.inspireawards-dst.gov.in/
भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे
. Inspire award करिता शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.
तरी आपण सर्वांनी inspird award स्पर्धेत भाग घ्यावा
अधिक माहितीसाठी *खालील व्हिडीओ पाहावा.*
*उपक्रम ११७*
दिवसभरातील कोणती अशी एक गोष्ट आहे की जी तुम्ही नेहमी करता पण ती तुम्हाला आवडत नाही ते लिहून काढा. ती गोष्ट तुम्हाला का आवडत नाही आणि तरीही तुम्ही ती का करता, त्याने काय फायदा होतो याचा विचार करा.
*उपक्रम ११८*
कागद कसा आणि कशापासून तयार होतो, आपण दिवसभरात सामान्यतः कोणकोणत्या गोष्टींसाठी विविध प्रकारे कागदाचा वापर करतो आणि त्यापैकी किती कागद आपण पुन्हा वापरतो आणि किती कागद टाकून देतो याची माहिती मिळवा. वापर न करता वा पुन्हा वापर न करता फेकून दिलेल्या कागदामुळे काय नुकसान होते याचा विचार करा / माहिती मिळवा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


आपली प्रतिक्रिया व सूचना