SQAAFअंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन
शाळा स्तरावर माहिती भरणे! संपूर्ण
माहिती व संपूर्ण मार्गदर्शन
सन 2025 - 2026 वर्षाकरिता SQAAF अंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन शाळा स्तरावर मूल्यांकन करायचे आहे
SQAAF अंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन सुरु झालेले आहे
दिनांक 15 एप्रिल 2026 पर्यंत शाळा स्वयंमूल्यांकन शाळा स्तरावर मूल्यांकन करायचे आहे
त्याकरिता खालील प्रमाणे शाळा स्तरावर संपूर्ण कार्यवाही करायची आहे
➤ SQAAF-Maharashtra App वापराबाबत महत्त्वाच्या सूचना
१) मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये, www.maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF tab मधील अ.क्र. ८ मध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून “SQAAF Maharashtra” हे अॅप डाउनलोड करून घ्यावे. अथवा Google Play Store वरून SQAAF – Maharashtra” हे App डाउनलोड करावे.
२) मोबाईलमध्ये अॅप ओपन केल्यावर सर्वात प्रथम Login Window दिसेल.
३) मोबाईलमध्ये अॅप ओपन केल्यानंतर Login साठी मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा Udise नंबर नमूद करावा. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.
४) नवीन विंडोवर शाळेचा Udise + मध्ये नोंदविलेला इमेल आयडी नमूद करावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.
५) नवीन विंडोवर मुख्याध्यापक यांचा Udise + मध्ये नोंदविलेला मोबाईल नंबर / फोन नंबर दहा अंकी नमूद करावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.
६) नवीन विंडोवर SQAAF साठी प्राप्त झालेला password नमूद करावा. (Udise + मध्ये नोंदविलेल्या इमेल आयडी वर हा password आपणाला प्राप्त झाला आहे. आपण (Udise मध्ये मध्ये नोंदविलेल्या इमेल वरील INBOX / SPAM BOX मध्ये इमेल प्राप्त झाला आहे का याची खात्री करावी. Password प्राप्त न झाल्यास खालील सूचनेनुसार कार्यवाही करावी.) व पुढे जा या बटनावर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल.
७) येथे आपणाला शाळेचा udise नंबर, मुख्याध्यापक यांचा Udise + मध्ये नोंदविलेला मोबाईल नंबर, शाळेचा Udise + मध्ये नोंदविलेला इमेल आयडी, SQAAF साठी प्राप्त झालेला password दिसेल त्याखाली लॉगीन बटन दिसेल त्या बटनाला क्लिक केल्यानंतर पुढील विंडो ओपन होईल.
८) येथे आपणाला ३ टॅब दिसतील. पहिल्या टॅब मध्ये शाळेच्या संबंधित सर्व माहिती दिसेल. (शाळेचे नाव, शाळेचा udise नंबर, मुख्याध्यापकांचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा.) आपली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.
९) त्या खाली “स्वयं मूल्यांकन सुरु करा” हा दुसरा टॅब दिसेल त्या वर क्लिक करावे.
पुढील विंडो ओपन होईल.
१०) येथे सुरवातीस सारांश दिसेल.
(एकूण मानकांची संख्या १२८, प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या-०, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या १२८, प्राप्त गुण / एकूण गुण ०/५१२)
११) त्याखाली १ ते १२८ मानके क्रमाने दिसतील. ज्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवावयाचा आहे. त्या मानक क्रमांकावर क्लिक करावे पुढील विंडो ओपन होईल.
१२) त्या विंडो मध्ये सुरवातीला मानक क्रमांक, त्याखाली मानक विधान व त्यानंतर त्या मानकाशी संबंधित वर्णन विधाने दिसतील. आपल्या शाळेसाठी लागू होणारे वर्णन विधान निवडून त्या वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्या वर्णन विधानाचे पुरावे नोंद करण्यासाठी PASTE PROOF हा टॅब ओपन होईल. येथे आपण या मानकासाठी तयार केलेली GOOGLE DRIVE ची लिंक PASTE करावी.
GOOGLE DRIVE ची लिंक PASTE केल्यानंतर SUBMIT हा टॅब ओपन होईल. त्यावर क्लिक करावे.
आपला त्या मानकासंबंधी प्रतिसाद नोंदविला जाईल. अशा प्रकारे १ ते १२८ मानकासाठी प्रतिसाद नोंदवावयाचा आहे. सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविणे बंधन कारक आहे.
१३) सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविल्यानंतर “स्वयं मूल्यांकन अंतिम करा” हा तिसरा टेंब ओपन होईल. जो पर्यंत सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविला जाणार नाही तो पर्यंत स्वयं मूल्यांकन अंतिम करा हा टॅब ओपन होणार नाही.
१४) “स्वयं मूल्यांकन अंतिम करा” या टॅब वर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकांसाठीचे हमीपत्र दिसेल. या हमिपत्राचे वाचन करावे व त्या खाली दिलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करावे. चेक बॉक्स वर क्लिक केल्यानंतर “स्वयं मूल्यांकन अंतिम करा” हे बटन ओपन होईल त्यावर क्लिक करावे आपल्या शाळेचे स्वयं मूल्यांकन पूर्ण होईल.
१५) पुढील पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन असा संदेश सर्वात वर दिसेल. त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल.
१६) आपण फायनल सबमिशन केल्यानंतरचा प्रतिसाद डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावा. डाउनलोड केलेल्या प्रतिसादाची प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावी.
१७) याच पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या इत्यादी माहिती दिसेल.
१८) याच पेजवर स्वयं मूल्यांकन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावे व त्याची प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावी.
१९) आपला प्रतिसाद पूर्ण नोंदविल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिकेत दर्शविल्यानुसार आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची खात्री करून घ्यावी.
२०) स्वयं-मुल्यांकन/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मुल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.
एकूण गुणांपैकी प्राप्त गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येईल)
प्राप्त गुण श्रेणी
91 ते 100 टक्के A+
81 ते 90 टक्के A
71 ते 80 टक्के B+
61 ते 70 टक्के B
51 ते 60 टक्के. C+
50 टक्के पेक्षा कमी C
➤ गुगल ड्राईव्हची लिंक बनविणेबाबतची कार्यवाही-
१. आपल्या शाळेस लागू होणाऱ्या वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती घ्यावी.
२. माहिती घेतल्यानंतर आपल्या शाळेस लागू असणारा स्तर लक्षात घ्यावा.
३. स्तर लक्षात आल्यानंतर त्याची वस्तुस्थिती दर्शविणारी माहितीची पीडीएफ तयार करा. (उदा. फोटो/अहवाल/व्हिडीओ स्वरुपात असेल तर.)
४. प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या व शाळेची वस्तुस्थिती दर्शविणारे कागदपत्र / दस्तऐवज याची एकच स्वतंत्र पीडीएफ फाईल किंवा फोल्डर तयार करण्यात यावा व त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यावे. उदा. मानक क्र. ५१ मुख्याध्यापक कक्ष
५. पीडीएफ तयार केल्यानंतर ती पीडीएफ आपल्या शाळेच्या ई-मेलशी संबंधित गुगल ड्राईव्हवर अपलोड करावी व आवश्यकतेनुसार लिंक तयार करावी. आपल्या ई-मेल आयडीच्या ड्राईव्हवर संपादित करण्याची क्षमता (Capacity) तपासून घ्यावी.
६. गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकासाठी तयार करण्यात आलेल्या पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करून घ्यावी. गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेली पीडीएफ फाईलची
लिंक कॉपी करताना त्याच मानकासाठी बनवलेली लिंक कॉपी केली आहे का? याची खात्री करावी.
➤ गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया :
• गुगल ड्राईव्ह उघडाः शाळेचाच ईमेल आयडी वापरून लॉगिन करा आणि गुगल ड्राईव्ह (Google Drive) उघडा.
• फाईल किंवा फोल्डर निवडा: ज्या फाईल किंवा फोल्डरची लिंक तयार करायची आहे, ती निवडा.
• शेअर पर्याय निवडा: निवडलेल्या फाईलवर किंवा फोल्डरवर राईट क्लिक करा किंवा वरच्या मेनू बारमध्ये “शेअर” (Share) बटनावर क्लिक करा.
• लिंक सेटिंग्ज बदलणे: एक पॉप-अप विंडो उघडेल. येथे “Get link” किंवा “लिंक मिळवा” या पर्यायावर क्लिक करा. तुमच्याकडे काही पर्याय असतीलः
• Restricted (मर्यादित): फक्त तुम्ही ज्या व्यक्तींना परवानगी दिली आहे त्यांनाच लिंक बघता येईल.
• Anyone with the link
(लिंक असलेल्या कोणालाही): ही सेटिंग निवडल्यास, ज्या कोणाकडे लिंक असेल त्याला ती फाईल बघता येईल.
• लिंक कॉपी करा: “Copy link” किंवा “लिक कॉपी करा” या बटनावर क्लिक करा.
१. जिथे लिंक पेस्ट करायची आहे ती जागा निवडा:
मानकाखाली दिलेल्या टॅबमध्ये तुमच्या फाईलची कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
२. लिंक पेस्ट कराः कर्सर ठेवून राईट क्लिक करा आणि “Paste” (पेस्ट) पर्याय निवडा किंवा कीबोर्डवरील “Ctrl + V” (विंडोज) किंवा ” Cmd + V” (मॅक) हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करा.
३. प्रत्येक मानंकाचे वस्तुस्थितीदर्शक पुरावे दर्शविणारे मानकनिहाय पुरावे हे त्या त्या फोल्डर मध्ये असावेत.
४. पेस्ट लिंक केल्यानंतर त्याखाली असणारा “सबमिट करा” हा टॅब ओपन होईल त्यावर क्लिक करावे. अशाप्रकारे आपल्या शाळेसाठी लागू असणाऱ्या सर्व मानकांची निश्चित्ती करून माहिती पूर्ण करावी.
५. एखाद्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवून सबमिट केल्यानंतर आपणाला नोंदविण्यात आलेल्या प्रतिसादात बदल करावयाचा असल्यास अथवा
गुगल ड्राईव्हची लिंक बदलावयाची असल्यास आपण केव्हाही/कितीहीवेळा बदल करू शकतो.
६. आपली माहिती फायनल सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्हवर मानकासंबंधित तयार केलेली फाईल अथवा फोल्डर यामध्ये कुठलाही बदल करू नये किंवा ती फाईल डिलीट करू नये. बदल अथवा डिलीट केल्यास SQAAF कार्यालय/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या मुल्यांकनासाठी ती फाईल उपलब्ध होणार नाही त्यामुळे मुल्यांकनात अडथळा येवू शकतो.
७. आपल्या शाळेसाठी लागू नसणाऱ्या मानकासाठी वर्णन विधानाच्या खाली दर्शविण्यात आलेल्या “लागू नाही” या पर्यायावर क्लिक करावे. “लागू नाही” हा पर्याय निवडल्यास फाईलची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही. सबमिट टॅब ओपन होईल.
आपल्या शाळेसाठी कोणती मानके लागू नाहीत ते खालील तक्त्यात दिले आहेत. त्यानुसार आपला प्रतिसाद नोंदविण्यात यावा.
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

आपली प्रतिक्रिया व सूचना