Ads Area

Online and Offline Study - Teaching Report

ऑनलाईन व ऑफलाईन 

अध्ययन - अध्यापन अहवाल 

 संकलन

 राज्यातील सर्व व्यवस्थापन,माध्यमाच्या सर्व शिक्षकांचा

 साप्ताहिक ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन - अध्यापन अहवाल संकलन करणे

ऑनलाईन व ऑफलाईन  अध्ययन - अध्यापन

राज्यातील सर्व शाळा सध्या बंद आहे परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये 

याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे

शिक्षक मित्र, डिजिटल अध्यापन यामार्फत अध्यापन अध्ययन सुरू आहे  ही अभिनंदनीय बाब आहे

राज्यातील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ विद्यालय तील शिक्षक आपल्या विद्यार्थी करिता 
 शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमातून शालेय स्तरावर जे जे प्रयत्न करीत आहे त्या सर्व उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेतली जाणार आहे

 त्याकरिता संपूर्ण राज्यातील शाळेतील सर्व  शिक्षकांचे ऑफलाईन ऑनलाईन अध्ययन-अध्यापन याबाबत संकलन होणार आहे

महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण व क्रीडा विभाग  पोर्टल वर नोंदणी करणे आवश्‍यक आहे
त्याकरिता खालील वेबसाईटवर आपली नोंदणी करावी व खालील Link वर क्लिक करा


शिक्षकाची नोंदणी करताना खालील मुद्दे प्रमाणे करावी

  • School Dise Code*
  • Last Name
  • First Name
  • Middle name
  • Gender
  • Mobile number
  • WhatsApp number
  • Email ID
  • Teacher type

वरील प्रमाणे नोंदणी झाल्यावर आता आपण Save करावे

आता आपल्याला नोंदणी केलेले मोबाईल वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून कन्फर्म करा 

आता नविन पासवर्ड आपल्या सोयीनुसार तयार करावे.

आपल्याला पोर्टल वर एकदाच नोंदणी करणे आवश्यक आहे.
पुन्हा पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
 दरवेळेस पोर्टल वर फक्त Login करावे

 वरील प्रमाणे नोंदणी झाल्यावर दर आठवड्याला आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरावी
त्याकरिता पुन्हा खालील पोर्टलवर आपले मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करावे
खालील वेबसाईटवर क्लिक करा

ऑनलाईन व ऑफलाईन  अध्ययन - अध्यापन अहवाल संकलन


आता आपण ऑनलाईन ऑफलाईन अध्ययन-अध्यापन बाबत अहवाल भरावे
दर आठवड्यातून शनिवार व रविवार ला आपल्या वर्गाची माहिती भरणे आवश्यक आहे

आपल्याकडे जेवढे वर्ग आहे त्या सर्व शिक्षकांनी  वर्गनिहाय माहिती भरणे आवश्यक आहे

एका शिक्षकाकडे बहुवर्ग असेल त्यांनी आपल्या सर्व वर्गाची  अहवाल भरणे आवश्यक आहे 

अहवाल भरण्याकरिता डॅशबोर्डवरील 
Add New Class वर क्लिक करा व
आपल्या वर्गाची माहिती भरा 


अध्ययन-अध्यापन अहवाल

  • वर्ग
  • तुकडी
  • शिक्षकांचे वर्गातील एकुण विद्यार्थी संख्या
  • आपण मागील संपूर्ण आठवड्यात नियमितपणे आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यासोबत फोन व्हाट्सअप गुगल मॅप द्वारे संवाद साधला आहे ती आकडेवारी
  • मागील संपूर्ण आठवड्यात आपण किती विद्यार्थी सोबत संवाद संपर्क साधला आहे विद्यार्थी संख्या
  • आपल्याला मागील संपूर्ण आठवड्यात किती विद्यार्थी सोबत अजिबात संवाद संपर्क साधता आला नाही
  • आपण मागील संपूर्ण आठवड्यामध्ये दैनिक सरासरी किती तास ऑनलाईन अथवा ऑफलाइन अध्ययन अध्यापनाचे काम केले आहे
  • याकरिता आपण उपयोगात आणलेली पद्धती कोणती ✨ फोन कॉल व्हाट्सअप मेसेज झूम Meeting गूगल क्लासरूम गुगल Meet यूट्यूब चैनल आणि इतर
  • संपर्क साधन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असणारे प्रयत्न नमूद करावे ✨ गृहभेटी , प्रत्यक्ष भेट व इतर
  • विद्यार्थ्यांच्या नेहमीत मूल्यमापनासाठी कोणती पद्धती वापरतात ✨ ऑनलाईन चाचणी ,व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून , ऑनलाइन शिक्षण दरम्यान प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, ऑफलाइन पद्धतीने, गृह भेटीदरम्यान छापील चाचणीद्वारे , स्वाध्याय पुस्तिका व इतर

अशाप्रकारे वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व वर्गाचे अध्ययन-अध्यापन अहवाल भरून Save करावे
आपल्या वर्गाचे अध्ययन-अध्यापन अहवाल पाहण्यासाठी View वर क्लिक करून आपल्याला अहवाल पाहता येतो

सदर माहिती सर्व शिक्षकांनी आपल्या मोबाईलवरूनच भरावी

राज्य स्तरावर शिक्षकनिहाय , शाळानिहाय , केंद्रनिहाय, तालुकानिहाय , जिल्हानिहाय संकलन होणार आहे

अध्ययन-अध्यापन अहवाल करिता आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापननाचे सर्व प्राथमिक माध्यमिक , उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयातील मुख्याध्यापक , प्राचार्य  व शिक्षकांना तात्काळ  अवगत करण्यात यावे
सदर माहिती नियमितपणे भरावे

विशेष माहिती


विज्ञान विभाग SCERT पुणे व भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर ) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ५ वी ते १२ वी च्या विज्ञान व गणित विषय शिक्षकांसाठी या दोन विषयातील विविध नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण संकल्पना व कृतीवर आधारित दहा ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. तरी वर्ग ५ वी ते १२वी च्या गणित व विज्ञान विषय शिक्षकांबरोबर च इतर विषयांच्या शिक्षकांनाही यामध्ये सहभागी होता येईल. तरी इच्छुक सर्व शिक्षकांनी नोंदणी करावी.


दिनकर पाटील
 संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र  पुणे

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad