National Toy Fair Organizing

 राष्ट्रीय खेळणी जत्रा 

आयोजन सन 2020 - 2021

 राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१(National Toy Fair) च्या अनुषंगाने आयोजित  राज्यस्तरीय ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेस शिक्षक आणि विद्यार्थी यांनी  नावनोंदणी करण्याबाबत.*  

     


              विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या  हेतूने आर्टस आणि अ‍ॅस्थेटिक्स विभाग,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि  प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली *राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ (National Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने  *दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१* या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळणीचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने होणाऱ्या जत्रेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे.करिता राज्यस्तरीय खेळणी व गेम निर्मिती स्पर्धेमध्ये मोफत सहभाग घेता येईल.


  सदर कार्यालयामार्फत राज्यातील सर्व  शिक्षक आणि विद्यार्थी यांना राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ 

मध्ये उत्कृष्टरित्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल खेळणी, डिजिटल गेम्स,रोबोटिक्स यासंदर्भात तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मार्गदर्शन  देण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांना या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे- 

      *नोंदणी लिंक-*

      विद्यार्थी यांचेसाठी नोंदणी लिंक-  https://forms.gle/hgzt79SHWBLfJkMHA


     शिक्षक यांचेसाठी नोंदणी लिंक - https://forms.gle/AaPE4trrwgeSDGgf9


*मार्गदर्शक सूचनासाठी लिंक-*

https://drive.google.com/file/d/1h2ddGukByrWN9KU-yGHfVTvellM76qdV/view?usp=sharing


राज्यातील संबंधित शाळा, क्षेत्रीय अधिकारी,शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

राष्ट्रीय खेळणी जत्रा वेळापत्रक


*(राहुल द्विवेदी भा.प्र.से.)*

*राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक,*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,*

*महाराष्ट्र, पुणे.*

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad