Mahila Shikshan Din Sajara

महिला शिक्षण दिन साजरा

 स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. स्त्रियांच्या मुक्तीदात्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व धटकांपर्यंत पोहचविणे व त्यांनी रुजविलेले शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्म दिवस राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तसेच, शासकीय,निमशासकीय कार्यालयात महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्त खालीलप्रमाणे विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्यात यावेत:-


१. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचेपूजन करण्यात यावे.


२. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक यांनी त्यांध्या कार्याविषयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा .


३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करावे.


४. चिद्यार्थ्यांचे गट करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी चर्चासत्रे घेण्यात यावीत. ५. ऑनलाइन वेबिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे


स्फूर्तिदायी लेखन व विचार यावर परिसंवाद आयोजित करावा. ६. महिला शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे स्री शिक्षणातील महत्व लक्षात घेऊन त्यांचा गौरव करणे,

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटनांवर आधारित पथनाट्य, एकपात्री नाटक. यांचे आयोजन करणे


८. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनानिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यभांच्या इयत्ता १ ली ते १२ वी तील सर्व विद्यार्थ्यांनी भाषण/ वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध लेखन, परिसंवाद, एकांकिका यासारखे कार्यक्रम स्तरनिहाय / गटनिहाय राबविण्यात यावेत. उपक्रमात सहभागी होऊन 

Mahila Shikshan Din Sajara

#महिलाशिक्षणदिन

#मी_सावित्री

#mee_savitri

या HASHTAG (#)

 वर व्हिडीओ व साहित्य upload करावे. याशिवाय विविध समाज माध्यमावर ( फेसबुक, इंस्टाग्राम,


द्वीटर) अपलोड करावेत. यासाठी शिक्षक व पालकांनी त्यांना सहकार्य करावे.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला शिक्षण दिन" साजरा करण्यासाठी खालील उपक्रमांचे

आयोजन करण्यात यावे:

स्तर/उपक्रमाचा गट

इयत्ता १ ली ते ५ वी

भाषण -

 क्रांतीज्योती सावित्रीबाई

३ मिनिटे

***************************

इयत्ता ६ वी ते ८ वी

निबंध लेखन. 

   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

३०० ते ३५० शब्द

***************************

इयत्ता ९ वी ते १० वी

वक्तृत्व.

  स्त्री शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाई फुले

५मिनिटे

***************************

इयत्ता ११ वी ते १२ वी

परिसंवाद / एकांकिका

मी सावित्री बोलतेय

५ मिनिटे

************************

२. वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करताना कोविड -१९ चा विचार करून सर्व नियमावलीचे पालन 

करण्यात यावे..


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in

या संकेत स्थळावर उपलब्ध

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad