National Toy Fair Time Table

 राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021

वेळापत्रक

National Toy Fair

Time Table

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१(National Toy Fair ) च्या अनुषंगाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेस शिक्षक आणि विद्यार्थी यांनी नावनोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक 

सूचना आणि वेळापत्रक-

अ.राज्यस्तरीय नियोजन वेळापत्रक

राष्ट्रीय खेळणी जत्रा- 2021 ही ऑनलाईन पद्धतीने

दिनांक २७ /०२/२०२१ ते  दिनांक ०२/०३/२०२१ या कालावधीत होणार आहे. यासाठी राज्याचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व होण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.

जानेवारी 2021

• पहिला आठवडा- NTF 2021 करिता आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन उदबोधन कार्यशाळा नोंदणी

नावनोंदणी लिंक

• दुसरा आठवडा - राज्यस्तरीय ऑनलाईन उदबोधन कार्यशाळा (विषय- Toy Making Orientation)


तिसरा व चौथा आठवडा- विषयानुसार प्रत्यक्ष खेळणी/बोर्ड गेम्साइलेक्ट्रोनिक खेळणी इ. तयार करुन त्याचे फोटो आणि व्हिडीओ दिलेल्या लिंकद्वारे अपलोड करणे.(लिंक पुन्हा नव्याने देण्यात येईल.)

फेब्रुवारी 2021

• पहिला व दुसरा आठवडा- राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा तसेच NTF 2021 करिता राज्याचे ऑनलाईन प्रतिनिधित्व करण्यासाठी निकषानुसार निवड प्रक्रिया


• शेवटचा आठवडा- राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा आणि NTF 2021 साठी उत्कृष्ट खेळणी/ games/apps/ board games इ.चे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने प्रतिनिधित्व.

ब. राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021- मार्गदर्शक सूचना


पार्श्वभूमीः

विद्याध्याच्या विकासामध्ये खेळणी-खेळाद्वारा अध्ययन करणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो. खेळणी विद्यार्थ्यांना विविध कृतीमध्ये गुंतवून ठेवतात. यामुळे विद्यार्थ्यांचे समस्या निराकरण कौशल्य,ज्ञानेंद्रियांना चालना, सृजनशीलता, कल्पकता, कारक कौशल्य आणि इतर उदिष्टे साध्य करण्यासाठी ही मदत होत असते. वेळेनुसार खेळण्यांच्या स्वरूपामध्ये बदल झाला असला तरी त्यांचे महत्व कमी झालेले नाही.


माननीय प्रधानमंत्री यांनी त्यांच्या 30 ऑगस्ट 2020 च्या "मन की बात' मध्ये खेळण्यांचे भव्य मार्केट विचारात घेता आत्मनिर्भर भारतीय खेळणी या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी विविध संधी साधण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

उद्दिष्टेः

1. संस्था,शिक्षक,शिक्षक प्रशिक्षक,विदयार्थी यांना त्यांनी तयार केलेली शैक्षणिक खेळणी सादर करण्यासाठी संधी देणे,

2. विद्यार्थ्यांना त्यांची नैसर्गिक जिज्ञासा वृत्ती, सृजनशीलता,नवनिर्मिती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

3. विद्याथ्र्याना नाविन्यपूर्ण कल्पना वापरून शैक्षणिक खेळणी तयार करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्या माध्यमातून विविध संकल्पनांचे आकलन होण्यास मदत करणे.


4. खेळणी किंवा खेळादवारे शोधन आणि अनुभव आधारित अध्ययन, स्वयंपूर्णता, सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये त्यांचे महत्व तसेच त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत विविध व्यक्ती संस्कृती, समाज आणि पर्यावरण यांचा कसा परिणाम होतो याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे,


खेळणी प्रकार:

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ करिता खेळणी तयार करण्यासाठी खेळणी प्रकार-


1. भारतीय खेळणी किंवा खेळ

2. ऑनलाईन खेळणी- मोबाइल/ वेब अॅप, डिजिटल खेळणी.

3. प्रत्यक्ष खेळणी (Physical toys)- इलेक्ट्रॉनिक आधारित, बोर्ड गेम/काई गेम कोडी। बोर्ड कोडी/ डिजिटल कोडी, Craft/Material based/Static Toys (Puppets and Clay modeling items), Moving Toys.


4. विविध वयोगट आणि स्तरासाठी शैक्षणिक किटस (मॅन्युअलसह)


5. Do It Yourself (DIY) (वर्गात विद्यार्थ्यांनी तयार केलेली असावीत.)


खेळणी जजेसाठी विषय (Themes):-


अ. भारतीय संस्कृती व इतिहास, माहितीचे अध्ययन यासाठी खेळणी

खेळणी, दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक खेळणी, शारीरिक सुदृढता आणि क्रीडेसाठी खेळणी $. Out of Box-Creative and fun


ई. पारंपरिक भारतीय खेळण्यांचे नवे रूप.


सहभागी होण्यासाठी स्तरः-

१. प्राथमिक स्तर पहिली ते पाचवी

२. उच्च प्राथमिक स्तर - सहावी ते आठवी

३. माध्यमिक स्तर- नववी ते दहावी

४. उच्च माध्यमिक स्तर - अकरावी ते बारावी


खेळणी किंवा खेळ तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना वर उल्लेख केलेल्या कोणत्याही स्तरासाठी,विषयासाठी खेळणी तयार करता येतील.


• सहभागी शिक्षक आणि विद्याथ्थ्यानी स्वतः खेळणी तयार करणे बंधनकारक असेल. खेळणी तयार करण्याची प्रक्रिया ही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करण्यात यावी. सादरीकरणासाठी हिंदी/इंग्रजी भाषेत स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेला आणि ते खेळणे कसे वापरावे याचा आशय असलेला डेमो व्हिडिओ तयार करण्यात यावा.


खेळणी किंवा खेळ कोणत्या संकल्पनेसाठी/ कौशल्यासाठी उपयुक्त ठरेल ते माहितीत देण्यात यावे. प्रत्येक खेळाखेळणी सोबत खालील प्रमाणे माहिती देणे आवश्यक राहील.


१.उदिष्टे २,वयोगट किंवा शिक्षणाचा स्तर ३.वापरलेले साहित्य ४.लागलेला वेळ ५.संकल्पना किंवा कौशल्य


६.किंमत


७.प्रक्रिया- खेळ किंवा खेळणी वापरण्याची पद्धती. 8. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे वापरले जाईल? (शक्य असल्यास)


खेळणी कशी वापरावीत याचे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण करावे. • स्थानिक आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यास प्राधान्य देण्यात यावे.

सर्व विद्यार्थ्यांना हाताळता येतील अशा प्रकारचे खेळण्यांचे स्वरूप असावे. तयार केलेली खेळणी टिकाऊ,सुरक्षित आणि कमी खर्चिक असावीत, विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि चिकित्सक विचार कौशल्य विकसनासाठी Open


ended खेळणी यावर विचार करण्यात यावा. राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ ही ऑनलाईन/आभासी पद्धतीने होणार आहे याची नोंद


घ्यावी. त्यामुळे खेळणी निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ संकल्पना नोटसह देणे बंधनकारक असणार आहे.


इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि डिजिटल खेळ (Game)तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना:


डिजिटल गेम्स डिजिटल स्वरूपामध्ये ऑनलाइन पद्धतीने ते वापरण्यास दिले जातात. वेब आधारित आणि मोबाईल अॅप्लीकेशन आधारित खेळ खालीलप्रमाणे तयार करता येतील-


P.Augmented Reality Application


R.Simulations


3. Artificial Intelligence


4.Virtual Reality


E. Virtual Tours


b.Robotics


8.STEM Toys( Science,Technology,Engineering,Mathematics)


८.पारंपरिक भारतीय खेळांना डिजिटल स्वरूप देणे


संकल्पना नोट:- प्रत्येक डिजिटल गेमसाठी खालील प्रकारे संकल्पना नोट तयार करण्यात यावी.


. खेळाडू कोण असणार आहे?


. गेमची उद्दिष्टे


. गेममध्ये असलेली चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण कौशल्ये खेळाडूला येणाऱ्या अनुभवांचे स्पष्टीकरण(जिंकणे,संपादन,सहकार्य,पायऱ्या)


गेममध्ये अध्ययन आणि आनंद हे घटक कसे अंतर्भूत आहेत त्याचे स्पष्टीकरण. खेळाडूचा अंतर्गत प्रेरणेला कशाप्रकारे प्रतिसाद देता येईल?


तांत्रिक स्पष्टीकरण:


वापरलेले टूल्स/सॉफ्टवेअर/गेम इंजिन.


गेमसाठी प्लॅटफॉर्म (मोबाईल/प्ले स्टेशन /लॅपटॉप/इतर). दीक्षा अॅप व पोर्टलला कशा प्रकारे जोडता येईल?


वरील मार्गदर्शक सूचना आणि नियोजन अधिकाधिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यवाही यावी.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad