Ads Area

Guidelines On Health And Safety After School Starts

शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य,

 स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक

 उपायोजनाबाबत

Back To School

शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2020 नुसार

मार्गदर्शक सूचना:

१) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परीस्थिती सतत राखणेः-

शाळेचा परीसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.

शाळेतील वर्गखोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठभाग जसे लेंचेस,

अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टॅबलेट्स, खुा इ.वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे . शाळेतील व शाळेच्या परीसरातील सर्व कचरा नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावी.

• हात घुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. शक्य झाल्यास अल्कोहोल मिश्रित हॅन्ड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावा.

• शाळेतील स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जतुकीकरण करण्यात यावे.


• सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात यावी.

विद्यार्थ्यांनी सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे. • शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमितपणे निजंतुकीकरण करण्यात यावे.

* वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना

 सहभागी करून घेऊू नये.

२) शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे :-

सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत , शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी,

विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज साधी आरोग्य चाचणी जसे hemal Screering घेण्यात यावी.

विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिला शाळेचा आवारात व शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये.

काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणावे.

३) विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे:-

 कोविड-१९ संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वतः त्यांच्या  वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे.

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क.१४०/एसडी-६

• शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहनात येतांना व वाहनातुन उतरल्यानंतर) निजतुकीकरण करण्यात यावे.

वाहनचालक व वाहक यांनी स्वत: तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील. याची दक्षता घ्यावी. किमान ६ फुट अंतर राखण्यात यावे.

बस/ कार यांच्या खिडक्यांना पडदे नसावेत, सामान्यत: खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.

वातानुकूलित बसेस मध्ये २४ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान राखावे.

 • शक्य असल्यास वाहनात हॅन्ड सनिटायझर ठेवण्यात यावे.

४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन (Entry and Ext) :

 . विद्यार्थ्यांनी शाळेने निश्चित केल्याप्रमाणे शाळेत उपस्थित रहावे. शाळेत वावर त्यांनी किमान ६ फुट अंतराचे पालन करावे.

विद्यार्थी व कर्मचारी वर्गांचे आगमन व गमन (Entry and Exit) यांचे वेळापत्रक प्रकारे निश्चित करावे, ज्यामुळे शाळेत होणारी गर्दी टाळली जाईल. विविध इयत्तांचे वर्ग सुरु होण्याच्या व संपण्याध्या वेळामध्ये किमान १० मिनिटांचे अंतरअसावे.

शाळा सुरु मार्गदर्शक...

शाळेच्या बाहराल वाहनाची गर्दी टाळण्यासाठी वाहतुक पोलिस किंवा समाजातील स्वयंसेवकाची मदत घ्यावी.

शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचान्यास रजेवर राहण्याची

परवानगी देण्यात यावी. कुटुंबातील एखादा सदस्य किंवा घराजवळील एखादी व्यक्ती ताप / खोकला यांनी आजारी असल्यास आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याबाबत पालकांना अवगत करावे.

५) वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करावी:-

• शाळेत प्रात्यक्षिक कार्य Practicals) घेताना विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करुन घेण्यात यावेत म्हणजे शारीरिक अंतराचे (Physical Distancing) पालन करणे सुलभ होईल.

विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, इत्यादींची अदलाबदल करू नये.

. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी.

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र.१४०/एसडी-६

शक्य असल्यास वर्ग खुल्या परिसरात घ्यावेत. शक्य नसल्यास वर्गखोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये वर्ग भरवण्यात येऊ नये.

उदवाहन (It) व व्हरांड्यांतील उपस्थित व्यक्तीच्या संख्येवर निर्बंध आणावेत. * स्वच्छतागृहामध्ये अधिक गर्दी होऊ नये, याची दक्षता घ्यावी.

• विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. • वातानुकुलित वर्ग खोल्यांचे तापमान २४ ते ३० डिग्री सेंटिग्रेड ठेवावे.

६) अभ्यासवर्गाची व्यवस्था:-

• शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे (५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी). अशाप्रकारे एकाच दिवशी ५० टक्के विद्यार्थी ऑनलाईन बर्गात व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील.

इयत्ता निहाय ऑनलाईन व ऑफलाईन वर्गाचे वेळापत्रक, शिक्षकांची जबाबदारी निश्चिती याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. शक्यतो मुख्य विषय (Corm Subjects) जसे गणित, विज्ञान व इंग्रजी शाळेत शिकवावेत व उर्वरित विषय शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शिकवावेत. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये.

 प्रत्यक्ष वर्गांकरिता जेवणाची सुट्टी नसेल.

 ७) कोविड-१९ संशयित आढळल्यास करावयाची कार्यवाही:-

. शिक्षक, कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे.

तात्काळ रुग्णालय किंवा जिल्हा व राज्य संपर्क क्रमांकास (Helpline) कळवावे, त्यानंतर सर्व परिसराचे व त्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे.

 राज्य व जिल्हा helpline क्रमांक तसेच जवळील कोविड सेंटर बद्दलची माहिती मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकांच्या मोबाईलमध्ये असावी.

८) मानसिक व सामाजिक कल्याण :-

• चिंता आणि निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदविणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नियमित समुपदेशन केले जाईल. सुनिश्चिती करावी.

• शिक्षकांनी, शालेय समुपदेशकांनी आणि शालेय आरोग्य कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे आपले मानसिक स्थिरता निश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे.

उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक कराव्यात.


*शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्या नविन आदेशाप्रमाणे

दिनांक 27 जानेवारी 2021 पासुन 11:00 ते 2:00 वेळात शाळा भरवायच्या संभाव्य नियोजनाबाबत*


🔶 *Cheking*
(Temp (Below 98.5), oxy above 95)
*11:00 to 11:20*
   (20 miniuets)

 🔶 *1st Period English*
*11:21 ते 12:00*
   ( 40 Miniuets)

  🔶 *2'd Period (Math*
 *12:01 to 12:40*
      (40 Miniuets)

🔶 *3'rd Period (Science)*
(12:41 to 01:20)
    (40 Miniuets)

🔶 *4'th Period*
   (Other Subjects: Marathi / Hindi /Social Sciences)
 (01:21 to 2:00)
 (40 Miniuets)

*टीप :* 
🔺 *पालकांचे संमतीपत्र आवश्य घ्यावे अन जे पालक संमतीपत्र देणार नाहीत त्यांच्या पाल्यांना शाळेत प्रवेश देवू नये.

🔺 *ज्या विद्यार्थ्याच्या शरिराचे तापमान 37 अंश सेल्सीयस  किंवा 98.6 फॅरनहाईट पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देवू नये.

🔺 *ऑक्सिमिटरवर ज्याच्या शरीरात/रक्तात 89 ते 90 % पेक्षा कमी ऑक्सिजनचे प्रमाण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देवू नये.

🔺 *मास्क, आंतर, सॅनिटायझर कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.

🔺 *सर्व विद्यार्थ्याची आडव्या तक्त्यात एकत्रित नावे लिहुन    दररोज दिनांकवार तापमान,ऑक्सिजनच्या प्रमाणाच्या नोंदी ठेवाव्यात.

🔺 *उपरोक्त 11 ते 2 वेळातच तासिकांचा वेळ कमी जास्त करता येईल. गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांनाच प्रत्यक्षात अध्यापनात प्राधान्य दयावयाचे आहे.

🎒 *आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा उघडल्या, 'हे' नियम पाळणं गरजेचं.!*

📗 राज्यातील अनेक भागात शाळेच्या बाहेर गर्दी दिसून आली. सुमारे 10 महिन्यांनंतर मुंबई वगळता संपूर्ण राज्यात 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले.
🗣️ *शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या..*
▪️ विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन केवळ मास्क घातलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. अनेक शाळांनी स्वतःहून विद्यार्थ्यांसाठी मास्कची व्यवस्था केली आहे. 
▪️ शिक्षकांना शाळेकडे निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःची पुस्तके स्वतःच हाताळावी.
▪️ '5 वी ते 8 वीच्या वर्गांचा टप्पा यशस्वी झाल्यानंतरच पुढील टप्प्यात  चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू', असं महत्त्वाचं मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय.
▪️ मुंबईत बीएमसीने पुढील सूचना येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील ग्रामीण भागात आजपासून शाळा सुरू होणार आहेत.
▪️ शिक्षण मंत्री म्हणाल्या की, 'शाळा पुन्हा सुरु केल्या जात आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना मास्क घालूनच शाळेत पाठवावे', असं म्हटल्या.
📜 *शिक्षण विभागाच्या एका निवेदनानुसार,* "सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी राज्यातील 22,204 शाळांतील इयत्तेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही 27 जानेवारीपासून इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करत आहोत. राज्यात 5 वी ते 8 वी इयत्तेत 78.47 लाख विद्यार्थी आहेत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad