Ads Area

Guidelines Before Starting School

 शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य,

 स्वच्छत्ता विषयक 

उपाययोजनांबाबत

मार्गदर्शक सूचना

१) शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा :- 

• शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

Thermometer, Thermal Scanner/Gun, Pulse Oxymeter, जंतूनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे

calibrated contactless infrared digital thermometer असावे. शाळा वाहतुक सुविधांचे निर्जंतुकीकरण  करावे.

एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णतः निर्जंतुकीकरण करावे.

क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

२) शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी:

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी  कोविड-१९ साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी.

• ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे.

 • ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड-१९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी.

३) कार्यगट गठीत करणे:-

 सर्व भागधारकांचे त्यांच्या विशिष्ट जबाबदान्यांसहित विविध कार्यगट गठित करावे जसे आपत्कालीन गट, स्वच्छता पर्यवेक्षण गट, इत्यादी. शिक्षक, विद्यार्थी व इतर भागधारक या गटांचे सभासद म्हणून सहकार्याने काम करतील,

४) बैठक व्यवस्था :-

. वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.

वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.

५. शारीरिक अंतर (Pyulcal distancing) च्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे:

शाळेत दर्शनी भागावर Physica dstancing. मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे posters/stickers प्रदर्शित करावे.

थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

शाळेच्या अंतर्गत व बाहा परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर Physical distance) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे जसे पाणी पिण्याच्या सुविधा , हात धुण्याच्या सुविधा, स्वछतागृहे इत्यादी ठिकाणी करण्यात यावा.

शारीरिक अंतर (Physical dstance) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.

६ शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निबंध :-

 परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निबंध असेल. शिक्षक पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात.

७) पालकांची संमती:

* विद्यार्थ्यांने शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक

असेल,

पालकांची संमती पत्र

 शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये,

विद्याथ्यांना त्यांच्या पालकांच्या संगतीने घरी राहुन देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी.

८. विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-१९ च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुक करणे:

• शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करुन पुढील मुध्दांबाबत कार्यवाही करावी:

 1. वैयक्तिक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागांचे निर्जतुकीकरण

इत्यादीबाबत काय करावे किंवा काय करु नये याबाबतच्या सुचना.

शारीरिक अंतर पालनाचे (Physical distancing) चे महत्व. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छताविषयक सवयी,

iv. कोविड-१९ बाबतच्या गैरसमजुती,

v. कोविड-१९ ची लक्षणे आदळल्यास शाळेत जाणे टाळणे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड-१९च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमच्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार

९) शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजा याबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे: 

* विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमती वर अवलंबून असेल

शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

१०) माहितीचे एकत्रिकरण:

विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून पुढील माहिती स्वयंघोषित करुन घ्यावी: त्यांची आरोग्याची स्थिती, आरोग्य सेतू अॅप वरील तपासणी अहवाल, तसेच अलीकडील आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य प्रवासाची माहिती. स्थानिक प्रशासनाकडून राज्य व जिल्हा hepine तसेच जवळील कोविड सेंटर बद्दलची माहिती.

वरील मार्गदर्शक सूचना शासन निर्णय

 दिनांक 10 नोव्हेंबर 2020 नुसार आहे

💠 दिनांक २७जानेवारी पूर्वतयारी💠

【इ.५,६,७,८ वर्ग सुरू करण्यासाठी】

1️⃣ *वर्ग निर्जंतुकीकरण करवून घेणे*(ग्रा.पं.तर्फे किंवा स्वतःऔषध आणून)

2️⃣ दररोज शिक्षक,विद्यार्थी, कर्मचारी यांची ताप मोजण्यासाठी *थर्मल गन खरेदी करणे.* [समग्र अनुदानातून]

3️⃣ *ऑक्सिमीटर खरेदी करणे* [समग्र अनुदानातून]...ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी

4️⃣मास्क मुलांना खरेदी करणे, सँनिटायझर खरेदी करणे[समग्र अनुदानातून]

5️⃣ हात धुण्यासाठी *पाणी, नळ,साबण उपलब्ध ठेवणे*

...स्वच्छता संकुल स्वच्छ ठेवणे,वापरात ठेवणे, निर्जंतुक ठेवणे...

6️⃣ ५,६,७,८वर्गांना विषय वा शिष्यवृत्ती शिकवणाऱ्या सर्व

*शिक्षकांनी RTPCR ही कोरोना चाचणी करवून घेणे,* प्रमाणपत्र शाळेत ठेवणे.

7️⃣ कुठल्याही परिस्थितीत शाळेत हजर *शिक्षक व विद्यार्थी मास्क वापरतील.*..मास्क न वापरणाऱ्यांची गंभीर नोंद घेतली जाईल...

8️⃣शाळेत प्रत्येकी २विद्यार्थ्यांमध्ये *६फूट अंतर असेल.* शिक्षक,विद्यार्थी अंतरही ६फूट असेल... जमिनीवर वर्तुळे/चौकोन काढून त्यामध्ये मुले बसतील... *विद्यार्थी जागा दररोज एकच असेल.* डेस्क वा बाकांवर झिगझ्याग पद्धतीने६फूट अंतर असेल.

9️⃣ दररोज शिक्षक, विद्यार्थी यांची *ताप व ऑक्सिजन मोजून नोंदी घ्याव्यात.*

🔟परिपाठ होणार नाही.लघवी, पाणी  यासाठी सर्व वर्ग/ मुले यांना एकदाच सोडू नये...मुले एकत्र येणार नाहीत. शाळेत जेवणार नाहीत. स्वतःच्या वस्तू-वहीपेन, मास्क, पाणी बाटली-एकमेकांना देणार नाहीत.तोंडात, नाकात,डोळ्यांत बोट घालणार नाहीत.

1️⃣1️⃣शाळा किमान३तास,कमाल४तास भरेल..सकाळी१०ते दुपारी२ही वेळ योग्य असेल.

1️⃣2️⃣जास्त संख्या असणाऱ्या शाळेत ५०%आज व ५०%उद्या असे विद्यार्थी हजर राहतील...

1️⃣3️⃣ *पालकांचे शाळेत धाडण्यास तयार असल्याबाबत प्रमाणपत्र बंधनकारक आहे.* अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही...

1️⃣4️⃣ मास्क शिवाय शाळेत कुणालाही प्रवेश नसेल...【 *जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं!*】

1️⃣5️⃣ऑनलाईन वर्ग चालूच राहतील.. शाळेत गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवर भर द्यावा. ऑनलाईन इतर विषय घ्यावेत.

 *संदर्भ*- १८जानेवारी२०२१,१०नोव्हेंबर,८सप्टेंबर,२९ऑक्टोबर,१७ऑगस्ट,२२जुलै,२४जून,१५जून चे शासन निर्णय पहावेत.शाळेत ठेवावेत...पाळावेत

संदर्भ
परिपत्रक  / GRदिनांक१५ जून २०२०लिंकडाऊनलोड
टप्याटप्याने शाळा सुरू करणेबाबत मार्गदर्शक सूचना
संदर्भपरिपत्रक / GRदिनांक२९ ऑक्टोबर २०२०लिंकडाऊनलोड
शिक्षक-शिक्षकेतर उपस्थिती- मार्गदर्शक सूचना.
संदर्भपरिपत्रक / GRदिनांक१० नोव्हेंबर २०२०लिंकडाऊनलोड
शाळा सुरु, मार्गदर्शक सूचना -1


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad