वर्ग 5 वी ते 8 वी चे शाळा
सुरक्षितपणे सुरु करणे
वर्ग ५ वी ते ८ वी चे वर्ग राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितपणे सुरु करणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र.२०४/एसडी-६ मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय,मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १८ जानेवारी, २०२१
वाचा:- दिनांक १० नोव्हेंबर,२०२०.
पार्श्वभूमी -
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये वरील संदर्भ क्र. ७ येथील परिपत्रकान्वये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग दि. २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरु करण्यात आले आहेत.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु असून टण्या- टण्याने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे.
राज्यातील कोविड बाघित रूम्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्य:स्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आलेली आहे असे दिसून येत आहे.
त्यामुळे शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होऊ नये या धारणेतून शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी हितावह राहील
राज्यातील शाळा सुरू करण्यास सार्वजनिक आरोग्य विभाग सहमत आहे. यानुसार राज्यातील इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी साठी शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
१. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी चे वर्ग दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. शाळा सुरू करताना कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच या विभागाच्या संदर्भाधीन दि.१५ जुन, २०२० , दि. २९ ऑक्टोबर,२०२० व दि. १० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
संबंधित जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका इत्यादींनी शाळा व वर्ग सुरक्षितपणे सुरु होतील याची दक्षता घ्यावी.
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र.२०४/एसडी-६
३. सदर शासन परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या अभिप्रायांच्या अनुषंगाने सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निर्गमित करण्यात येत आहे.
४.स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०११८१२३७०६९१२१ असा आहे.
PDF Download


आपली प्रतिक्रिया व सूचना