Ads Area

Student Aadhaar Registration And Updating

विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व

 अद्ययावतीकरण

 विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करणेबाबत.

राज्यातील सर्व विभागाच्या, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणे व अद्ययावतीकरणाचे काम पुर्ण करुन संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री Validatior) करणे आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी प्रत्येक गटसाधन केंद्रावर (CRC य URC) दोन याप्रमाणे एकूण ८१६ आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment KD उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

सदर आधार नोंदणी संचाद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज करण्यासाठी आधार ऑपरेटरची सेवा ऋ्रयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. त्रयस्त संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार ऑपरेटरची नावे संदर्भ क्र.४ च्या पत्राद्वारे आपणास उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

 तसेच यावितिरिक्त प्रत्येक तालुक्याकरीता दोन ऑपरेटर या प्रमाणात आधार ऑपरेटर दिनांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील. 

आधार ऑपरेटर मार्फत शालेय विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज प्रभाविपणे करण्याकरीता आपणास खालीलप्रमाणे निर्देश देणे उचित वाटते.


१. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज करण्याकरीता संदर्भिय पत्र क्र. १,२ व ३ नुसार विस्तृत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. पंचायत समिती स्तरावर रुजू झालेले आधार ऑपरेटर यांचेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज अपेक्षितपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार नोंदणी संच व आधार ऑपरेटर यांच्या माध्यमातून विद्यार्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकर कामकाज सुक्ष्म नियोजन करुन प्रभावीपणे करण्यात यावे.


२. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाची माहिती Student Portal वरती शाळा Login वरुन अद्ययावत करण्यात येत आहे. दि. १३/०৭/२०२१ पर्यंत अद्ययावत करण्यात आलेल्या आधार क्रमांकाच्या माहितीचा तपशील विभागनिहाय खालीलप्रमाणे आहे.

Student Portal Update

विद्यार्थ्यांच्या आधारची माहिती अद्ययावत केल्याबाबत माहितीचा जिल्हानिहाय तपशिल यासोबत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक आहे त्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची अचूक माहिती Student Portal वरुन शाळा Login वरुन Upload करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

 ३. आधार जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांचेकडून खालीलप्रमाणे कामकाज करुन घ्यावे.

३.१ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचेकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kat) मध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यास आधार नोंदणी संच पुरवठा करणाऱ्या पुरवठेदाराकडे संपर्क करुन तांत्रिक बिघाड दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे अथवा उपकरण बदलून घेणे, दररोज आधार ऑपरेटर मार्फत विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज चालू आहे किंवा कसे आची खतर जमा करणे.

३.२ आधार नोंदणी संचामध्ये येणारे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची कार्यवाही करणे व इतर संख्यात्मक माहिती संकलीत करणे याकरीता समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असणारे जिल्हा स्तरावरील MIS Co-ordinator यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांचेकडून सदर काम करुन घेण्यात यावे.


३.३ आधार क्रमांक उपलब्ध असणार्या विद्यार्थ्याची माहिती शाळा Login वरुन Student Portal वरती अद्ययावत करण्याची कार्यवाही संबंधितांकडून करुन घेण्यात यावी. याकरीता येणान्या तांत्रिक अडचणीबाबत क्षेत्रीय यंत्रणेना मार्गदर्शन करणे.


३.४ सदर अधिकाराच्याचा तपशिल खालील विहित नमुन्यामच्ये प्राथमिक शिक्षण संचालनालयास

उपलब्ध करुन देण्यात यावा.

आधार जिल्हा समन्वय अधिकारी व MIS Co-ordinator यांना UIDAI मार्फत प्रशिक्षण दि. १८/०१/२०२१ रोजी Zoom Meeting द्वारे आयोजित करण्यात आले आहे. उक्त बैठकीस संबंधीतांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत.


४. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आणि शालेय विद्यार्थ्यांची आधारची माहिती Student Portal वर upload करणे. उक्त कामकाज नियोजनबद्धपणे सुरु असल्याची खात्री प्रत्येक आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करुन करावी.


४.१ विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज करताना येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी सोडवण्याची कार्यवाही करावी.


४.२ शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक) यांचेमार्फत उक्त कामकाजाचा आढावा विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडून दर शनिवारी/रविवारी घेण्यात येईल. यानुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्ययावतीकरण आणि शालेय विद्यार्थ्याची आधारची माहिती Student Portal वर upload करणे, कामकाजाचा आढावा क्षेत्रिय यंत्रणेमार्फत नियमितपणे घेण्यात यावा आणि आपल्या कार्यक्षेत्रातील कामकाज पुर्ण करुन घेण्यात यावे.

Students Portal वर Upload

  • Student पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपलोड होत नसेल  तर Update Student मेनू वर क्लिक करा
  • त्यानंतर वर्ष वर्ग निवडा
  • ज्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड माहिती अपलोड करायचे आहे विद्यार्थी सिलेक्ट करा त्यानंतर  विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बाबत माहिती भरा
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad