STARS प्रकल्पाची उद्दिष्टे
१. STARS प्रकल्पाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
आ) पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण देणे आणि नियमित व गतीशील प्रयत्नाने अध्ययन निष्पत्ती सुधारण्यावर भर देणे.
आ शिक्षकांचे प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे, शैक्षणिक प्रशासकीय
व्यवस्था पारदर्शक बनविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करणे.
राज्यातील विद्यार्थ्यांची मूल्यांकन व्यवस्था सुधारणे.
ई) शाळाबाह्य मुले, विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचीत समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
१.१. स्टार प्रकल्पामध्ये प्रगती श्रेणीकरण दर्शकानुसार (Performance Grading Index) खालील बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे
1. पूर्व प्राथमिक (Early Childhood) शिक्षणाचे सशक्तीकरण-
अंगणवाड्यांना शक्यतो प्राथमिक शाळेच्या आवारात आणणे, आंगणवाडी सेविकांना व शिक्षकांना आंनददायी शिक्षण देता यावे यासाठी अभ्यासक्रम, अध्ययन साहित्याचा दर्जा निश्चित करणे, प्रशिक्षण देणे. पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये प्रायोगिक तत्वावर काही आदर्श शाळा
सुरू करून त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणे. अध्ययन मुल्यांकन (assessment/ tests) पद्धतीत सुधारणा करणे.
अ) परीक्षा पध्दतीत सुधारणा करणे, प्रश्नांत सुधारणा करणे, आंतरराष्ट्रीय अध्ययन पध्दती कार्यक्रम (PISA-Program for International Student Assessment) च्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देणे, अध्ययनापूर्वीची तयारी, राष्ट्रीय फलनिष्पत्ती सर्वेक्षण (NAS) च्या आधारावर राज्य फलनिष्पत्ती सर्वेक्षण (SAS) करणे, इत्यादी.
ब) अभ्यासक्रम पध्दतीत सुधारणा परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी परीक्षांचा मुल्यांकन आकडेवारीचा वापर, एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्याबाबत असलेले आव्हान, विविध शाळा/परीक्षा मंडळाद्वारे परीक्षा पध्दतीत सुधारणा,
सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील साध्य व मुल्यांकनाच्या पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी मुल्यांकन केंद्र" सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
量。 शिक्षकांचा online व blended प्रशिक्षणाद्वारे विकास करणे व प्रशिक्षणावर प्रभावी सनियंत्रणासाठी स्वतंत्र Teacher Traning Platfrom विकसित करणे.
a.शिक्षकांचा सर्वांगीण विकास
माहिती व तंत्रज्ञान चा वापर करुन अध्ययन पध्दतीमध्ये सुधारणा, SCERT, DIET / BRC द्वारे नियमित कालावधीनंतर शिक्षकांचे प्रशिक्षण व त्यांच्या ज्ञानाची तपासणी करणे, शिक्षकांचे प्रशिक्षणाच्या आधारावर Certification करणे.
शाळेच्या वर्गातील अध्ययन
पध्दतीत सुधारणा:
अध्ययन पध्दतीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे. प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक पातळीनुसार गरजा निश्चित करून त्यानुसार त्याला ठराविक शैक्षणिक पातळीवर आणणे व त्यावे संनियंत्रण करणे.
शाळेचे नेतृत्व :
शाळेचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक ते नेतृत्व विषयक प्रशिक्षण देणे. M. शाळा ते काम/शाळा ते उच्च शिक्षण हे संक्रमण सुलभ करणे:-
मुलांना शिक्षण पूर्ण करून व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते व्यावसायिक प्रशिक्षण, यासाठी शिक्षकांचे आवश्यक त्या क्षेत्रात प्रशिक्षण. कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून मुलांमध्ये व्यावसायीक होण्यासाठी Career
Counselling करणे.
त्यांना प्रशिक्षणानंतर वेगवेगळ्या औद्योगिक समुहात Internship उपलब्ध करून देणे,
v. प्रभावी प्रशासन व विकेंद्रीत व्यवस्थापन करणे:
शिक्षकांची उपस्थिती, पारदर्शक निवड,नियुक्ती व बदली पध्दती, शाळांचे व शिक्षकांचे नियमित पर्यवेक्षण व तपासणी या सर्व बाबींचे संगणकीकरण करणे,
शिक्षकांच्या सेवापुस्तकांचे तसेच शिक्षकांच्या प्रशिक्षणांच्या व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
२.प्रकल्पाची अंमलबजावणी-
समग्र शिक्षा अभियानाच्या एकात्मिक राज्य अंमलबजावणी सोसायटी (SIS) द्वारे STARS प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील निरिक्षणाची कामे जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे केली जातील
तर जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद है जिल्हा शिक्षण समितीचे प्रमुख असतील. सदर कार्यालय जिल्ह्याचा प्रकल्प विषयक वार्षिक कृती आराखडा आणि अर्थसंकल्प तयार करेल आणि प्रकल्पाची भौतिक आणि आर्थिक प्रगती यावर देखरेख ठेवेल.
समितीची रचना
अधिकाऱ्याचे नाव
जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी
| शिक्षणाधिकारी माध्यमिक
प्राचार्य. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET)
गट शिक्षणाधिकारी सर्व
केंद्रप्रमुख (२)
प्राचार्य/मुख्याध्यापक प्राथमिक/माध्यमिक (३)
| शिक्षणाधिकारी प्राथमिक
राज्य विशिष्ट अनुदान (State Specifio Grantp
निर्धारित ध्येय प्राप्त केल्यानंतर राज्यांना उत्तम कामगिरी करता यावी यासाठी केंद्राकडून राज्य विशिष्ट अनुदान देण्यात येईल व त्याचा वापर राज्य शासन शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यासाठी करु शकेल. अनुदान अदा करण्यासाठीचे निर्देशक ठरविण्यासाठी
शगुन, PMS आणि UDISE मधील राज्याच्या कामगिरीचा वापर केला जाईल. या कार्यक्रमाखाली खालील बाबींसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षकांचे सक्षमीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, अध्ययन साहित्य उपलब्ध करुन देणे, तांत्रिक क्षमतेचे वृष्दीकरण करणे.
ब) मुल्यांकन पध्दतीत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील मुल्यांकनानुसार राज्याची कामगिरी तपासण्यात येईल. शिक्षक प्रशिक्षण व सतत नियमित मुल्यांकनाबाबत आकडेवारीचा वापर करण्याची क्षमता आणि वर्गामध्ये विविध उपक्रमाद्वारे करण्यात येणारे मुल्यांकन यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
क) वर्ग अध्यापन सक्षमिकरण, शिक्षक आणि शाळा नेतृत्व विकास यासाठी शाळांवर परिणाम करणारे निर्देशांक, शिक्षण यंत्रणामधील कामाचा प्रभाव, SCERT, DIET यांची कामगिरी, यांचा ICT च्या अध्यापनात वापर. यासाठी या निधीचा उपयोग करता येईल.
ड) शाळा ते कामाद्वारे उच्च शिक्षणाकडे संक्रमण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मुल्यांकन, व्यावसायिक
शिक्षण तसेच समुपदेशन,
३) सुधारित सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षण व व्यवस्थापन विकेंद्रीकरण, प्रशासकीय व शैक्षणिक माहिती
व्यवस्थापन,
वित्तीय व्यवस्थापन:
समग्र शिक्षा अभियानाच्या प्रशासकीय व वित्तीय व्यवस्थापनाचाच वापर स्टार प्रकल्पासाठी केला जाणार आहे. त्यासाठी सहभागी राज्यांनी शालेय स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी PFMS च्या पद्धतीचा वापर करणे अनिवार्य आहे.
योजनांखालील खरेदी जागतिक बँकेच्या खरेदी नियमानुसार करण्यात येईल. खरेदीबाबतचे
मार्गदर्शनसुध्दा केंद्र शासनाकडून वेगळयाने निर्गमित केले जातील. ६. प्रकल्पाचा कालावधी
७. सदर योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष (बाहासहायित प्रकल्प) उघडण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
८. सदर शासन निर्णय निजोजन विभाग अनौ. सं. क्र. ४०/१४७१; दि.२२.०१.२०२० अन्वये प्राप्त
झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.


आपली प्रतिक्रिया व सूचना