Educational Program On DD SAHYADRI

 ज्ञानगंगा  शैक्षणिक कार्यक्रम

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे “ज्ञानगंगा” या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिकांच्या प्रक्षेपणाबाबत...

राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.

 यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये 

म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून, २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

 सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे.

 प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे.

 उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in 

या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी सोबतचा QR कोड स्कॅन करून अथवा येथे क्लिक करून

संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या DD Free Dish -

५२५, Dish TV - १२२९, Videocon D२H- ७६९, Tata Sky 9208, Hathway ५१३, या चॅनेल क्रमांकावर सर्व विद्यार्थ्याना सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.

तरी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरील सदर शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे.


(दिनकर टेमकर)


संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.



Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad