दहावीचा निकाल जाहीर
Maharashtra SSC Result 2021
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर
दुपारी निकाल!⚡
तुमचा निकाल पाहा
मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.
नविन लिंक 👉 निकाल पाहा
निकाल पहा
या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध
बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आलं होतं.
राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता.
आता ताज्या माहितीनुसार निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.
संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे
• सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार इ. ९ वीचा अंतिम निकाल, इ.१० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ. १० वीचे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
• दिनांक २८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही.
सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील
होईल.


Great job by dgital BRC
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना