Fit India Movement अंतर्गतच्या सामान्य ज्ञान चाचणी (Quiz) बाबत
उपरोक्त विषय व संदर्भ क्र. १ नुसार, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय व स्पोर्ट अॅथोरीटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीबाबत सर्व विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी परिपत्रक निर्गमित केले होते. संदर्भ क्र. १ ला अनुसरून प्रस्तुत कार्यालयाने सामान्य ज्ञान चावणीबाबत राज्यामधील सर्व शाळांना अवगत करण्यासाठी संदर्भ क्र.२ चे पत्र निर्गमित केले होते. तथापि संदर्भ क्र.३ च्या शुद्धिपत्रकानुसार सामान्य ज्ञान चाचणी (Quiz) साठी शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी Fit India च्या पोर्टलवर पुढील सूचना येईपर्यंत करू नये असे सूचित केले होते.
संदर्भीय परीपत्रक क्र.४ नुसार सामान्य ज्ञान चाचणी (Quiz) चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असून, साधारणपणे दिनांक १ सप्टेंबर २०२१ पासून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. (प्रत सलग्न) चाचणीची उद्दिष्टे, स्पर्धा कार्यपद्धती, शाळा नोंदणी, विद्यार्थी नोंदणी व नोंदणी फी, शालेय स्तरावरील चाचणी फेरी, माध्यम, वेळापत्रक, वेळ, गुणदान पद्धती, प्रत्येक फेरीअंती निवड पद्धती, प्राथमिक फेरी, राज्यस्तर फेरी, राष्ट्रीय स्तर फेरी,
बक्षीस योजना, शाळेची भूमिका या सर्व बाबीची सविस्तर माहिती या परिपत्रकात नमूद केलेली आहे. या सामान्य ज्ञान चाचणी बाबतची माहिती आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उचित कार्यवाही करावी.
( एम. डी. सिंह, भा.प्र.से.)
संचालक
संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


आपली प्रतिक्रिया व सूचना