Ads Area

Pre-Matric Scholarship Scheme Implementation For Headmaster

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ अंमलबजावणी बाबत

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2021 -  2022

National Scholarship Portal

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना दिनांक २३ जुलै, २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इ. १ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावे.

केंद्रशासनाद्वारे प्रि मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सन २०२१-२२ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया NSP 2.0 या Website वर

दिनांक १८/०८/ २०२१ पासून सुरू करण्यात आलेली आहे.

नवीन व नूतनीकरण

 नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक १५/१२/२०२१ पर्यंत आहे.

 तसेच शाळा स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ / १२ / २०२१ व 

जिल्हा स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१/१२/२०२१ आहे.

मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर Profile Update

सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्व इच्छूक तसेच मागील वर्षीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या

www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal)

 या संकेतस्थळावरून आपले अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहे. 

सन २०२०-२१ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशाच विद्यार्थ्यांनी आपलेअर्ज Renewal student म्हणून भरावयाचे आहेत. (नुतनीकरण विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे.) तसेच पात्र नवीन इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh student म्हणून भरावयाचे आहेत.

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी नोंदणी केलेली पावती (Enrollment ID) किंवा बँक पासबुक (छाया चित्रासह) किंवा रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पास पोर्ट किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांक्षाकित केलेले फोटो सहीत असलेले विद्यार्थ्यांचे ओळख प्रमाणपत्रची सत्य प्रत शाळेत सादर करणे बंधनकारक आहे

मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे

• पात्रतेचे निकष

१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणारे / शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थि

२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. (ही अट इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही

३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे. (सक्षम अधिकान्याच्या सहीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे

४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. ५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे

६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आ

७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे

१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाण

२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक

३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र

४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकान्याचे प्रमाणपत्र

५. रहिवासाचा पुरावा

६. बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत

७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्रा

८. आधारकार्ड

सन २०२१-२२ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर नविन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची माहि भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार नुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व I.F.S.C कोड (विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्यास पालकांचे चालेल), कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळेचे नाव व यु-डायस क्रमांक, विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, इयत्ता, मागील वर्षी प्राप्त झालेले गुण पालकांचा व्यवसाय, पूर्ण पत्ता इ.. माहिती तसेच विद्यार्थी अनाथ आहे का? अपंग आहे का? असल्यास प्रकार व टक्केवारी इ. माहिती आवश्यक आहे.

नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक, कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळा सुरु झालेली तारीख, Day Scholar / Hosteler, विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी इत्यादी माहिती आवश्यक आहे.

K.Y.C. फॉर्मबाबत:

NSP 2.0 या पोर्टलवरती अद्याप ज्या शाळांनी K.Y.C. फॉर्म भरलेला नाही अशा सर्व शाळांनी K.Y.C. फॉर्म भरणे बंधनकारक आहे. INSP 2.0 या पोर्टलवरती शाळांनी K.Y.C. फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवरती सर्व्हिसेस या मेनू मध्ये Institute KYC Registration Form वरती क्लिक करुन शाळेचा यु-डायस क्रमांक व Captcha कोड टाकून सबमिट करावा. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती व शाळेची सर्व माहिती भरुन K.Y.C. फॉर्म सबमिट करावा. सोबत नोडल


ऑफिसर यांचे आधार कार्ड स्कॅन करुन जोडावे. K.Y.C. फॉर्म भरुन झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवावे. शिक्षणाधिकारी कार्यालयामधून K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी शाळेचा यु-डायस क्रमांक टाकून भरलेली माहिती तपासून, नोडल ऑफिसर यांचा मोबाईल क्रमांक बरोबर आहे याची खात्री करुनच Approve करावे. (टिप:- सर्व शाळाची K.Y.C. फॉर्म पोर्टलवरती भरणे आवश्यक आहे. शाळेमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी नसले किंवा शाळेमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसला तरीही पोर्टल वरती KY.C. फॉर्म भरणे आवश्यक आहे. यापूर्वी K.Y.C. फॉर्म भरलेला असेल जिल्हास्तरावरुन त्याची पडताळणी झाली असेल तर त्या शाळांना K.Y.C. फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)

शाळेचे नोडल ऑफिसर व शाळेचे मुख्याध्यापक यांची आधार नुसार माहिती भरण्याची प्रक्रिया.

• सन २०२१-२२ साठी प्रत्येक शाळेने Login केल्यानंतर शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे बंधनकारक आहे. (शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसले तरीही)

• शाळेचे Nodal Officer यांनी शाळेचा Login ID व Password वापरुन NSP पोर्टलवर शाळा Login करावी व शाळेच्या प्रोफाईल मध्ये शाळेची सर्व माहिती भरावी व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी नेमलेल्या नोडल ऑफिसर यांची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार contact person details मध्ये भरावी. यामध्ये नोडल ऑफिसर यांचा आधार क्रमांक आधार वरील नाव, जन्मतारीख, लिंग, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पद इ. माहिती भरावी.

• नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल क्रमांका वरती OTP येईल तो Verify झाल्यानंतर प्रोफाईल अद्यावत

होईल.

• Head Of Institution Details मधील माहिती यामध्ये बदल करावयचा असल्यास नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट करणे बंधनकारक आहे. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हेड लॉगिन मधून शाळेच्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहिती नूसार अद्यावत करावी.

• शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक बदलले गेल्यास नविन कार्यरत असणारे नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून व मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट हेड लॉगिन मधून अद्यावत करण्यात यावी.


नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक, कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळा सुरु झालेली तारीख, Day Scholar / Hosteler, विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी इत्यादी माहिती आवश्यक आहे.

महत्वाच्या बाबी

> मागील वर्षी असे लक्षात आले आहे की, अर्ज पडताळणीची अंतिम मूदत संपूनही शाळास्तरावर नविन व नूतनीकरणाचे अर्ज पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत. सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मूदतीमध्ये पडताळणी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात याव्या.

शाळा स्तरावरुन विद्यार्थ्यांचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थ्यास संधी देऊनही माहिती चूकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेकमार्क करण्यात यावा. बनावट अर्ज / चुकीचा अर्ज शाळा स्तरावरुन पडताळणी होऊन शिष्यवृत्तीसाठी जिल्हास्तरावर आल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

जिल्हास्तरावरुन शाळेतील चुकीचा अर्ज फेक मार्क करण्यात आल्यानंतर संबंधित शाळेतील सर्व अर्ज डिफेक्ट होऊन शाळास्तरावर जातील व शाळेने सर्व अर्ज बरोबर असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर संबंधित शाळेतील अर्ज जिल्हास्तरावरुन स्वीकारण्यात येतील.

> ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेस शासनाची मान्यता आहे परंतू वर्गास मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठही अर्ज स्वीकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज फेक मार्क करावे व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांच्यावर नियमानूसार कारवाई करण्यात यावी.

नूतनीकरण विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव शाळा बदलली असल्यास / नविन शाळेत प्रवेश घेतला असल्यास अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज Withdraw करण्यात यावे व अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज भरावयाचा असल्यास त्यांचा अर्ज NSP 2.0 या पोर्टलवरती नविन म्हणून भरण्यात यावा.

संदर्भ क्र. २ अन्वये शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर तसेच जिल्हयाचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती NSP 2.0 या पोर्टलवरती भरण्यात यावी.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व पात्र इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात याव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात येतील याची दक्षता घ्यावी.

संचालक
अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे ०१.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad