Constitution Day Celebrated All Schools In State

राज्यातील सर्व शाळेत संविधान दिन

 साजरा होणार

 शासन परिपत्रक

कालावधी

दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर २०२१

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत

नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.


राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम राबविणे बाबत....

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये, पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

 तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. 

शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद, तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.

माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम अंतर्गत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे

शिक्षक व विद्यार्थी करिता

1)  इ. तिसरी ते  पाचवी

 कार्यक्रमाचे नाव :

१. वक्तृत्व

२. रांगोळी

३. चित्रकला

विषय 

१. भारतीय संविधान

२. माझ्या शाळेतील संविधान दिवस

तपशील :

वक्तृत्व

दिलेल्या कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून  Social Media वर अपलोड

रांगोळी/ चित्रकला

दिलेल्या कोणत्याही विषयावर चित्र किंवा रांगोळी काढून चित्राचा किंवा रांगोळीचा  फोटो काढून Social Media वर  अपलोड करणे.

2)  इ. सहावी ते आठवी

कार्यक्रमाचे नाव :

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. घोषवाक्ये

४. स्वरचित काव्यलेखन

५. पोस्टर निर्मिती

 विषय 

१. संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास

२. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

३. भारतीय संविधान आणि लोकशाही

तपशील 

निबंधलेखन

दिलेल्या कोणत्याही विषयावर A - 4 आकाराच्या कागदावर १००० शब्दांपर्यंत निबंध लिहून त्याचा फोटो Social Media वर  अपलोड करणे.

वक्तृत्व

दिलेल्या कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून Social Media वर अपलोड करणे.

घोषवाक्ये आणि स्वरचित काव्यलेखन

A- 4 आकाराच्या कागदावर स्वरचित कविता किंवा घोषवाक्ये लिहून त्याचा फोटो Social Media वर  अपलोड करणे.

पोस्टर निर्मिती

दिलेल्या कोणत्याही विषयावर ए-४ आकाराच्या कागदावर पोस्टर काढून त्याचा फोटो Social Media वर  अपलोड करणे.

3)  इ. नववी ते बारावी 

कार्यक्रमाचे नाव :

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. पोस्टर निर्मिती

 विषय 

१. भारतीय संविधानिक मूल्ये

२. भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान

३. सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे

४. भारत देशाचा सन्मान, माझे भारतीय संविधान

तपशील :

निबंध लेखन आणि वक्तृत्व

दिलेल्या कोणत्याही विषयावर ए- ४ आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो आणि वक्तृत्वसाठी ०३ मिनिटांचा व्हिडिओ Social Media वर  अपलोड करणे.

पोस्टर निर्मिती

दिलेल्या कोणत्याही विषयावर ए-४ आकाराच्या कागदावर पोस्टर काढून त्याचा फोटो Social Media वर  अपलोड करणे.

(4) शिक्षक प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक) 

कार्यक्रमाचे नाव 

१. फलक लेखन

२. डिजिटल पोस्टर निर्मिती

विषय 

१. भारतीय संविधान

२. भारतीय संविधान आणि शिक्षण

३. भारतीय संविधानातील मुलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या.

४. भारतीय संविधान, माझे विद्यार्थी आणि माझी भूमिका

तपशील :

फलक लेखन आणि डिजिटल पोस्टर निर्मिती

दिलेल्या कोणत्याही विषयावर फ़लक लेखन करून त्याचा फोटो Social Media वर अपलोड करणे किंवा डिजिटल पोस्टर Social Media समाजमाध्यमांवर अपलोड करणे.

     HASHTAG (# )  वापर

उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य Social Media वर  ( फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम)

 #Constitutionday2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride

 या HASHTAG (# ) 

चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी. 

Social Media वर अपलोड केल्यानंतर लिंक कॉपी करून ठेवा

लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे

त्याचप्रमाणे ज्या भागात शाळा बंद आहेत, त्या भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन माध्यमातुन सहभागी व्हावे. सदर कार्यक्रमांतर्गत Social Media वर  अपलोड करण्यात आलेल्या पोस्टच्या नोंदी करण्यासाठी ऑनलाईन लिंक आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठीच्या सविस्तर सुचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात येतील.

सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad