Ads Area

Guidelines For School Open In State

राज्यातील ग्रामीण व शहरी 

भागातील दिनांक 01 डिसेंबर पासून

 शाळा सुरू होणार ! शासन निर्णय

राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहे

उद्या पासून शाळेची घंटा वाजणार

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.  

राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका तील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दिनांक ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तर दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत रण्यात आल्या आहेत.

२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी

.(i) शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात/ गावात कोविंडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

(i) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत

(iii) विद्याथ्र्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

 उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर,

 एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.

(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे. 

२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 

२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.

३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१ दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

 सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

४. दिनांक  १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.

५. दिनांक १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.

६. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड- १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे.

खालील लिंक वर क्लिक करा

  आरोग्य संदर्भात सूचना जाहीर

      पालकांचे संमती पत्र

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad