शिकू आनंदे सर्व भाग |
Learn With Fun All Part
वर्ग पहिली ते पाचवी
शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे
दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या "शिकू आनंदे " (Learn with Fun) या उपक्रमाबाबत
शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग वाढवण्याबाबत...
संदर्भ या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मराशसंप्रप/कला क्रीडा/शिकू आनंदे / २०२१/२०७६
उपरोक्त विषया नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतात. परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने "शिकू आनंदे" (Learn with Fun) हा उपक्रम दि. ३ जुलै, २०२१ पासून सुरु आहे.
मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पाहून कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असते. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येतात.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच ऑफलाईन अध्ययन अध्यापनाला ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची जोड असेल तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतिमान होईल व विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिनस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करावे व सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत आपल्या स्तरावरून या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे.
(डॉ. नेहा बेलसरे)
उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.
| शिकू आनंदे | क्लिक करा | |
|---|---|---|
| 1. | भाग 1 | पहा |
| 2. | भाग 2 | पहा |
| 3. | भाग 3 | पहा |
| 4. | भाग 4 | पहा |
| 5. | भाग 5 | पहा |
| 6. | भाग 6 | पहा |
| 7 | भाग 7 | पहा |
| 8 | भाग 8 | पहा |
| 9. | भाग 9 | पहा |
Test

आपली प्रतिक्रिया व सूचना