Class SSC And HSC Exam Students Good News

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता

महत्वाची बातमी !

Maharashtra Board Exam

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा पध्दतीमध्ये यावर्षी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून बदल केले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. 
त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑफलाईन घेता आला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनवर मोठे दढपण आले आहे. विद्यार्थ्यांनच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न
शिक्षण मंडळाने केला आहे.

परीक्षेसाठी पर्यवेक्षक 

परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून त्याच शाळेतील शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यावर्षी कॉपी प्रकरणाचा शोध घेण्यासाठी "स्कॉड' नसतील. तर यासाठी शेजारील शाळेतील एका शिक्षकाची बैठे पथक म्हणून नेमणूक केली जाणार आहे

शाळा तेथे परीक्षा केंद्र

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यावर्षी ही एकूण अभ्यासक्रमाच्या 75% अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना 15 ते 30 मिनिटे वेळ वाढवून दिला गेला आहे. 

दहावी आणि बारावीची
परीक्षा यंदा 15 दिवस उशिराने सुरू होत आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि
शिक्षकांनाही अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून यंदा
हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच शाळा तेथे परीक्षा केंद्र हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

सवलतीचे क्रीडा गुण 

( 10th Exam, 12th Exam) दहावी, बारावीच्या परीक्षा  आता जवळ आल्या आहेत.  ( Good News )
त्यामुळे विद्यार्थी (Students) सध्या जोमाने अभ्यासाला लागणार आहेत. साधारण दोन वर्षानंतर बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. 
कारण गेल्या दोन वर्षात कोरोनाची विद्यार्थ्यांनाही मोठी झळ बसली आहे. ती हानी भरून काढण्याचा सध्या शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. 
त्यामुळे शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आणखी एक Good न्यूज दिली आहे.

 दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. 
कारण आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. 
त्यामुळे मैदानात घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.

 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. 

तसेच इयत्ता बारावी HSS परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

इयत्ता 10 वींच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सवलत गुणांचे निकष SSC Exam

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्याचे परीक्षा मंडळाला निर्देश दिले.
असे मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा सवलत गुणांचे निकष HSC Exam

इयत्ता 12वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करीता सवलतीचे क्रीडा गुण देण्याचे परीक्षा मंडळाला निर्देश दिले.
असे मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे


  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad