SCERT पुणे मार्फत इ. १०
विद्यार्थ्यांकरिता यशस्वी परीक्षेची
तयारी मार्गदर्शन सत्र
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
Science And Technology Part 1
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राबाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता
यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दिनांक २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे.
सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे
मार्गदर्शन सत्र वेळापत्रक
| दिनांक | विषय | वेळ | लिंक |
|---|---|---|---|
| 23 फेब्रुवारी २०२२ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ | दुपारी ३.०० ते ४.३० | YouTube Link |
| 24 फेब्रुवारी २०२२ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ | दुपारी ३.०० ते ४.३० | YouTube Link |
| 25 फेब्रुवारी २०२२ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 | दुपारी ३.०० ते ४.३० | YouTube Link |
| 28 फेब्रुवारी २०२२ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 | दुपारी ३.०० ते ४.३० | YouTube Link |
| 1 मार्च २०२२ | परीक्षेची यशस्वी तयारी | दुपारी ३.०० ते ४.३० | YouTube Link |
सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राची माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, शिक्षक, पालक आणि
जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच सदर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाला
उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.