National Science Day Celebrate Educational Activities

राज्यातील सर्व शाळेत राष्ट्रीय विज्ञान 

दिन २०२२ निमित्त विविध शैक्षणिक

कार्यक्रमांचे आयोजन

National Science Day 2022

कालावधी दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ 

दरवर्षी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 
त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने 
राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेण्यात यावेत.

हँशटँगचा वापर

खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो व इतर साहित्य फेसबुक ,इंस्टग्राम,ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर Social Media

 #scienceday2022,
#nationalscienceday2022 

या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी व लिंक कॉपी करून नोंदणी करावी 

सर्व विद्यार्थी आणि शिक्षक नोंदणी


आपण समाज संपर्क माध्यमांवर Social Media अपलोड केलेल्या पोस्ट खालील लिंकवर नोंदविण्यात यावी

                नोंदणी लिंक

उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

खालील प्रमाणे उपक्रम

१) इयत्ता पहिली ते पाचवी

कार्यक्रमाचे नाव :

१. चित्रकला

२. पोस्टर निर्मिती

विषय :

१. माझी पृथ्वी

२. परिसरातील माझे मित्र / सोबती.

तपशील :

चित्रकला / पोस्टर निर्मिती : दिलेल्या दोन

विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र / पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा.

2) इयत्ता सहावी ते आठवी

कार्यक्रमाचे नाव :

१. निबंध लेखन

२. वैज्ञानिक रांगोळ्या

विषय :

१. स्वयंपाकघरातील विज्ञान

२. भविष्यातील दळणवळण.

३. माझी शाश्वत जीवनशैली.

४. विज्ञानातील संकल्पना.

तपशील :

निबंधलेखन :- दिलेल्या कोणत्याही विषयावर १००० शब्दांपर्यंत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.

वैज्ञानिक रांगोळी :- दिलेल्या विज्ञानातील संकल्पना या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.

3) इयत्ता नववी ते अकरावी

कार्यक्रमाचे नाव :

१. निबंध लेखन

२. फोटोग्राफी / व्हिडिओनिर्मिती

विषय :

१. माझा आवडता संशोधक

२. भविष्यवेधी विज्ञान सफर.

३. विज्ञानातील गमतीजमती.

४. जैवविविधता.

५. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन

तपशील :

निबंध लेखन :- दिलेल्या कोणत्याही विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.

फोटोग्राफी / व्हिडिओ निर्मिती :- दिलेल्या कोणत्याही विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा.

4) प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि

 माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी 12 वी


कार्यक्रमाचे नाव :

१. वैज्ञानिक प्रतिकृती निर्मिती

२. वैज्ञानिक खेळणी निर्मिती

विषय :

१. समाजोपयोगी विज्ञान

२. शाश्वत विकास

तपशील :

वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी

 निर्मिती :- दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची माहिती लिहून त्याचा फोटो आणि व्हिडीओ अपलोड करावा.

🌎🌎🌎

सदर उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

सहभागी व्हावे


राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी, शाळा, शिक्षक, पालक यांना अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad