MDM Portal Information Update

शाळेत शालेय पोषण आहार

दिनांक 15 मार्च 2022 पासुन

शिजविण्याबाबत शासनाचे पत्र

सरल प्रणाली अंतर्गत MDM पोर्टलवरील

माहिती अद्यावत करणेबाबत

MDM Portal

४.१ सर्व शाळांनी सरल प्रणाली अंतर्गत कार्यान्वित एमडीएम पोर्टलमध्ये आपल्या शाळेतील मुख्याध्यापक, शापोआ योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत आहेत किंवा नाही ? याची खात्री करून तालुका स्तरावरून संबंधितांचे नावे व मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावीत.

४.२ शाळेचे मुख्याध्यापक व शापोआ योजनेचे काम पाहणारे शिक्षक यांनी MDM मोबाईल App डाऊनलोड करुन लॉगिन करुन तपासून घ्यावे.

 जेणेकरून शाळा स्तरावर आहार शिजवून देण्यास सुरुवात झाल्यास पहिल्या दिवसापासून एमडीएमची माहिती पोर्टलवर नोंदविणे शक्य होईल.

४.३ शाळांचे MDM वेबसाईटवरील लॉगिन आयडी व पासवर्ड तपासून घ्यावेत, अद्यावत नसतील तर केंद्र प्रमुख लॉगिनवरुन शाळा पासवर्ड रिसेट करुन घ्यावेत.

४.४ तालुका स्तरावरून प्रत्येक शाळेची योजनेस पात्र पटसंख्या MDM पोर्टलमध्ये अचूकपणे नोंदवावी आणि शाळा स्तरावर पटसंख्येमध्ये होणाऱ्या बदलानुसार पटसंख्या अद्ययावत करण्यात यावी

४.५ शिजविलेल्या आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप सुरु झाल्याच्या दिवसापासून लाभ घेतलेल्या लाभार्थ्याची सर्व शाळांनी दैनंदिन माहिती MDM पोर्टलवर भरतील याची योग्य ती खबरदारी घ्यावी.

४.६ जिल्ह्यातील योजनेस पात्र शाळांची नोंद व संख्या MDM पोर्टलवर असल्याची खात्री करुन घ्यावी.
 ज्या शाळा बंद झाल्या आहेत अशा शाळा एमडीएम पोर्टल मधून वगळण्यात याव्यात आणि योजना लागू असलेल्या सर्व शाळा एमडीएम पोर्टलमध्ये समाविष्ट करणेकरीता संचालनालयास प्रस्ताव सादर करावा.

४.७ शाळांना एमडीएम पोर्टल संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत तालुका स्तरावरून मार्गदर्शन करून निराकरण करण्यात यावे.

४.८ उपरोक्त सर्व कामे दिनांक ११ मार्च, २०२२ पर्यंत पूर्ण होतील याची खबरदारी घेण्यात यावी.

४.९ आहार शिजवून देणाऱ्या यंत्रणेची इंधन व भाजीपालाची देयके शाळा स्तरावरून दररोज भरण्यात येणाऱ्या लाभार्थी संख्येनुसार अदा करण्यात येतील.
 सबब, क्षेत्रीय यंत्रणेने नियमितपणे MDM पोर्टलवर तालुक्यातील सर्व शाळा दैनंदिन माहिती अचूक व परिपूर्ण भरत असल्याची खात्री करावी.

४.१० शाळा स्तरावर पुरवठादारामार्फत वितरीत करण्यात आलेल्या तांदूळ व धान्यादि मालाची नोंद पुरवठादारामार्फत एमडीएम पोर्टल वर केली जात असल्याची खात्री करून पुरवठादाराची देयके प्राप्त झाल्यानंतर पोहोच पावतीवरून शाळानिहाय तांदूळ व धान्यादी मालाच्या नोंदी MDM पोर्टलमध्ये अंतिम कराव्यात. 



MDM Portal Maharashtra

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad