Teacher Inter District Transfer Schedule

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा

बदलीची प्रक्रिया सुरू

सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली वेळापत्रक जाहीर

  • प्रथम खालील लिंक वर क्लिक करा 
  • बदली पोर्टल
  • आपला मोबाईल नंबर टाईप करा
  • Send OTP ऑप्शन वर क्लिक करा
  • आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी आला असेल तो टाकून लॉगिन करा

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

 तांत्रिक कारणासह अन्य कारणास्तव सदर प्रणाली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला आहे. मात्र, आता ऑनलाईनद्वारे बदल्या करण्यासाठीची कार्यवाही पुर्ण झाली असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही खालील वेळापत्रकानुसार राबविण्यात यावी.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीकरिता अर्ज करणे

दिनांक ५/८/२०२२ ते ९ /८/२०२२

४ दिवस

--------------------------

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरु

दिनांक १०.८.२०२२ ते १२.८.२०२२

३ दिवस

--------------------------------

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमीत.

दिनांक १३.८.२०२२ ते १३.८.२०२२

१ दिवस

-----------------------------------

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात

1.जिल्हा परिषद शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) अपलोड करणे.

 दिनांक 2/8/2022 ते 3/8/2022


2.रोस्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करणे.

 दिनांक 4/8/2022

3.रोस्टर (बिंदुनामावली) शिक्षकांना अवलोकनाकरिता

प्रदर्शित करणे. 

दिनांक 4/8/2022 ते 5/8/2022

4.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीकरिता अर्ज करणे.

दिनांक 6/8/2022 ते 9/8/2022

5.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरु. दिनांक 10/8/2022 ते 12/8/2022  

6.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमीत. 

दिनांक13/8/2022

वेळापत्रक जाहीर

राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणाऱ्या आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात यावी. 

तसेच सदरची बाब आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून त्याबाबत संबंधित शिक्षकांकडून पोहोच घ्यावी व आपल्या अभिलेखामध्ये जतन करुन ठेवावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area