Ekatmik And Dvibhashik Textbook Teacher Traning Time Table

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणेबाबत ! SCERT Pune

प्रशिक्षण फीडबॅक लिंक उपलब्ध झाली आहे

उपरोक्त विषयान्वये, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेमार्फत दिनांक १७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण संदर्भात आपले अभिप्राय नोंदवा

Feedback

       Feedback Link

तरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या शासकीय व शासकीय अनुदानित सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकाऱ्यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

 संपूर्ण शिक्षक प्रशिक्षण वेळापत्रक

सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण तपशील आणि यूट्युबची लिंक खालीलप्रमाणे आहे .

       शिक्षक प्रशिक्षण वेळापत्रक

इयत्ता  माध्यमदिनांक व वेळडाउनलोड
पहिली मराठी माध्यमबुधवार १७/०८/२०२२ सकाळी १०.०० ते १२.५०      YouTube
Link
पहिली मराठी माध्यमगुरुवार १८/०८/२०२२ सकाळी १०.०० ते  3.00YouTube
Link
पहिली उर्दू माध्यम   बुधवार १७/०८/२०२२ सकाळी १०.०० ते १२.५०  YouTube
Link
पहिली उर्दू माध्यम गुरुवार १८/०८/२०२२ सकाळी १०.०० ते 3.00YouTube
Link
दुसरी मराठी माध्यम
बुधवार १७/०८/२०२२
 सकाळी १०.३० ते ०४.५० 
फक्त आदर्श शाळा
YouTube
Link
दुसरी मराठी माध्यमगुरुवार १८/०८/२०२२
 सकाळी १०.३० 
फक्त आदर्श शाळा
YouTube
Link
7


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे*

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. ऑनलाईन ट्रेनिंग अजिबात व्यवस्थित घेता आले नाही. एकतर एक शिक्षकी शाळा.... समोर मुलं व इतर जबाबदाऱ्या आणि जोडीला नेटवर्क प्रॉब्लेम होताच. त्यामुळे सारखा व्यत्यय येत होता. त्यामुळे समाधान मिळाले नाही.

    ReplyDelete
  2. Prashikshan uttam ghenyat aale mulyamapan ya vishaya sandarbhat shri. Sandip vakchavre saranni changle margdarshan kele.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad