प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण
योजनेअंतर्गत सरल MDM पोर्टल
वेबसाईटवरील Back Date Entry
सुविधा उपलब्ध !
MDM Portal Maharashtra
MDM Portal Maharashtra
महत्वाची सुचना
MDM BACK DATED ENTRY उपलब्ध झाले बाबत._
माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीकरीता Back Dated Data Entry ची सुविधा MDM Portal मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे
सदरची सुविधा दिनांक 15/04/2025 ते दिनांक 24/04/2025 पर्यंत उपलब्ध आहे
_सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही, त्यामुळे पुनः एकदा पुन्हा प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
शाळा लॉगिनवर
सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी. याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी
शाळा Login
Back Dated Data Entry
मुख्याध्यापक लाॅगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
माहिती भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
खालील वेबसाईट वर जावे.
From school login
त्यानंतर मुख्याध्यापक यांचा युसर आयडी व पासवर्ड टाकून लाॅगिन करावे.
• लाॅगिन झाल्यानंतर Menu वर क्लिक करून
• MDM Daily Attendance टॅब ला क्लिक करावे
• त्यानंतर वर्ष निवडा , महिना निवडा व ज्या दिनांकाची माहिती भरणे बाकी आहे तो दिनांक सिलेक्ट करण्यात यावा.
• मेनु निवडा व त्या दिनांकाची विद्यार्थी उपस्थिती माहिती भरण्यात यावी.
• शेवटी अपडेट बटनावर क्लिक करावे.
अशा प्रकारे ज्या दिनांकाची माहिती प्रलंबित आहे ती भरून घेण्यात यावी.
७ दिवसाचा कालावधी दिलेला असून त्या कालावधी मध्ये माहिती भरून घेण्यात यावी.
नंतर Back dated माहिती भरण्याची सुविधा बंद केली जाणार आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत एमडीएम पोर्टलमध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे देयके तयार करून अदायगी करण्याची कार्यपद्धती राबविली जाते.
तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा व आवश्यक सूचना तालुक्यांना देऊन सर्व ऑनलाईन कामकाज विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
योजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची शाळानिहाय दैनंदिन लाभार्थीची माहिती एमडीएम पोर्टलमध्ये भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ क्षेत्रीय कार्यालयांना व शाळांना आवश्यक ते निर्देश देऊन विहित कालावधीत कामकाज पुर्ण करण्यात यावेत.
MDM Portal Website Maharashtra
What's Up Group Join
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना