Sanch Manyata Website Start Teaching And Non Teaching Staff

संच मान्यता सन २०२२ - २०२३

करिता वेबसाईट सुरू 

सन २०२२-२३ च्या संच मान्यतेकरिता वेबसाईट सुरू झाली आहे

सन २०२२-२३ च्या संच मान्यतेसाठी
 दिनांक ०१.१२.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी.
आपल्या शाळेची संच मान्यता करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा


सन २०२२-२३ च्या संच मान्यतेसाठी दिनांक १.१२.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून

  •  Working Post या मेनूमध्ये 
  •  त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी. (शिक्षकेतर कर्मचारी )
  • Add Working Teaching Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून
  •  सर्व माध्यमाची कार्यरत पदे भरुन Update केल्यानंतरच Finalised या बटनावर क्लिक करावे.

मोबाईलवर भरत असाल

संच मान्यता 2022- 23 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.

➡️ खालील लिंक वर क्लिक करा व https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7 


➡️ ही माहिती आपण मोबाईलवर भरत असाल तर मोबाइलला प्रथमतः "Desktop Site" करून घ्या.

➡️ त्यानंतर "शाळा" यावर क्लिक करा.

➡️ त्यानंतर "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.

➡️ पुन्हा "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.

➡️ यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.

➡️ लॉगिन झाल्यानंतर संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर "Ok" असे म्हणा.

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून "Medium" निवडून घ्या व योग्य अनुदान  प्रकारानुसार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Non-Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान  प्रकारानुसार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यरत शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

➡️ "खात्रीसाठी "Progress Bar" चेक करून घ्या.

संच मान्यता महत्त्वाचे


आपल्या शाळेची संच मान्यता

या तारखेनुसार करा संच मान्यता
संचमान्यता २०२२-२३ साठी ०१-१२-२०२२ रोजीची कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरावी.

संच मान्यतेसाठी ३० नोव्हेंबर रोजीची पटसंख्या विचारात घेण्यात येणार आहे.


संच मान्यता पासवर्ड ची काही अडचण असेल तर केंद्रप्रमुख यांच्या स्कुल

पोर्टल वरून पासवर्ड रीसेट करता येईल.

संच मान्यता ही सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी फॉरवर्ड करणे
बंधनकारक आहे.

एकदा फॉरवर्ड केलेली संच मान्यता कोणत्याही लॉगीनवरून रिटर्न करण्याची सुविधा उपलब्ध नाही म्हणून संच मान्यतेची माहिती काळजीपूर्वक भरावी.

संच मान्यता फॉरवर्ड करण्याचा
अंतिम दिनांक ०६/०१/२०२३ असा राहील.

संच मान्यता फॉरवर्ड करण्याची जबाबदारी

विहीत मुदतीत संच मान्यता फॉरवर्ड करण्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय मुख्याध्यापकांची राहील. 

संच मान्यता फॉरवर्ड न केल्याने त्या शाळेची पदनिश्चिती होणार नाही

याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad