SLAS Survey Examination New Date Announce

राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण

(SLAS Survey) चाचणी 

दिनांक २४ मार्च २०२३ रोजी होणार

State Level Achievement Survey :- राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेले होते.

 मात्र संदर्भ क्र. ५ अन्वये सदर सर्वेक्षण हे जुनी पेन्शन योजनेबाबत Old Pension Scheme शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या बेमुदत संपामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी न घेणेबाबत कळविण्यात आले होते. 

मात्र जुन्या पेन्शन योजनेबाबत Old Pension Scheme शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा Maharashtra Government Employees Strike बेमुदत संप दिनांक २० मार्च २०२३ रोजी मिटलेला आहे. 

नवीन तारीख जाहीर

तरी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाचे (SLAS) आयोजन दिनांक २४ मार्च २०२३ रोजी करण्यात यावे.

सर्वेक्षण पूर्वतयारी म्हणून दिनांक २३ मार्च २०२३ रोजी क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांच साहित्य द्यावे.

 दिनांक २४ मार्च २०२३ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण करणेबाबत सूचना द्याव्यात. 

सर्वेक्षणाच्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी तालुकास्तरावर सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे. जिल्हास्तरावर दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे. 

दिनांक २७ किंवा २८ मार्च २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे जिल्हा समन्वयक यांचेमार्फत इयत्तानिहाय व शाळानिहाय वापरण्यात आलेल्या OMR शीटची पाकिटे जमा करणेबाबत अवगत करण्यात यावे. 

SLAS प्रश्नपत्रिका व न वापरलेल्या OMR शीट DIET स्तरावर जपून ठेवाव्यात.

तरी दिनांक २४ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) बाबत तालुका समन्वयक, क्षेत्रीय अन्वेषक, संबंधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत सूचित करण्यात यावे. 

आपल्या तालुक्यामध्ये सर्वेक्षणाची यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

अ) राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) च्या अनुषंगाने शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना.

१. दिनांक २४ मार्च २०२३ रोजी राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) करण्यात येणार आहे. 

२. सदर सर्वेक्षण इयता ३ री ५ वी व ८ वी च्या वर्गांचे करण्यात येणार आहे.

३. सदर सर्वेक्षण हे तणावमुक्त वातावरणात घेण्यात येईल याची काळजी घ्यावी.

४. सदर सर्वेक्षण म्हणजे परीक्षा नाही. यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक स्थिती जाणून घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थीनिहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत.

५. यासाठी इयता ३ री ५ वी ८ वी चे वर्ग असलेल्या शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) राज्यस्तरावरून निवडण्यात आलेल्या आहेत.

६. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेली आहे, हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था / प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांचेकडून कळविण्यात येईल. ७. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत, खाजगी

अनुदानित, आदिवासी विभाग, समाजकल्याण, कटक मंडळ या व्यवस्थापनाच्या शाळांचा

समावेश असणार आहे..

८. शाळा प्रमुखांनी सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व स्टाफसह शाळेच्या वेळेत शाळेत शाळेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

९. विद्यार्थी सर्वेक्षणासाठी एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी. 

१०. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाईल.

११. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील. 

१२. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.

१३. सर्वेक्षणासाठी निवड केलेल्या शाळांमध्ये निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी सर्वेक्षणाच्या दिवशी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात.

१४. क्षेत्रीय अन्वेषक यांना आवश्यक ती माहिती वेळीच उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.

१५. सर्वेक्षण दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक उपस्थित राहून नमुना निवडीची प्रक्रिया संपवून विहित वेळेत सर्वेक्षण कार्य पार पाडतील. निवडलेल्या विद्यार्थ्यांना SLAS ID देऊन बैठक व्यवस्था करतील.

१६. विद्यार्थी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक चाचणीच्या उत्तराचे प्रतिसाद OMR शीटवर नोंदविणार आहेत. 

१७. सर्वेक्षणासाठी पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती तयार ठेवावी.

१) शाळा UDISE क्रमांक

२) विद्यार्थी हजेरी पत्रक

३) इयत्तानिहाय पट (मुले+ मुली)

४) मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी

(५) कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी, इमेल आय. डी.

६) शाळा माध्यम:-

७) इयत्ता व तुकडी संख्या :-

८) शाळा व्यवस्थापन प्रकार

९) ग्रामीण / शहरी :-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad