समग्र शिक्षा अभियान अंतर्गत
शासनाकडून केंद्रप्रमुखांना संनियंत्रण
करण्यासाठी मोफत टॅबलेट मिळणार
समग्र शिक्षा अंतर्गत Monitoring Information System (MIS) मधून ६१७० केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करून देणेबाबत
समग्र शिक्षा अंतर्गत Monitoring Information System (MIS) मधून ६१७० केंद्र प्रमुखांना (CRC Head) संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करून देण्याबाबत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेद्वारे अंतिम करण्यात आलेल्या न्यूनतम दरानुसार आपली निवड करण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भ क्र. २ नुसार GeM पोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने आपणांस पुरवठा आदेश देण्यात आला आहे.
संदर्भ क्र. ३ नुसार पुरवठा आदेशाच्या अनुषंगाने GeM प्रणालीवरील करारनामा आदेश स्विकृत केल्याबाबत कळविले आहे. त्याअनुषंगाने ६१७० केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध होण्याकरिता जिल्हानिहाय टॅबलेट संख्या नमूद असलेली यादी आपणांस या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे


आपली प्रतिक्रिया व सूचना