SSC Board Examination Important Tips For Student

उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावीच्या

परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी हि 

काळजी घ्या ! सविस्तर वाचा

 SSC Board Exam Maharashtra

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे 2022-2023  शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्यापासून होणार आहे. 


अशातच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात...

▪️  दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे.

▪️ विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र आणि MSBSHE दहावीचे प्रवेशपत्र अनिवार्य आहे.

▪️ परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. 

▪️ विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही.

▪️ उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक बरोबर टाकावा.

▪️ प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करावी.

▪️ पेपरमध्ये खाडाखोड करणे टाळावे.

▪️ प्रश्न बारकाईने वाचूनच उत्तर लिहावे.

▪️ प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. त्यानुसार वेळेचे नियोजन करावे.

▪️ तीन तासांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये अधिक दहा मिनिटे वाढविण्यात आली आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad