Maharashtra School New Academic Year

राज्यातील सर्व शाळेचे नवीन 

शैक्षणिक वर्ष १२ जून पासून होणार 

सुरू ! उन्हाळी सुट्टी २ मे पासून


Maharashtra School :-

विद्यार्थ्यांकरिता खुशखबर उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आले आहे

दिनांक 2 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे

 राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत.


उन्हाळी सुट्टी व शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन

उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय परिपत्रकानुसार शासनाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत

Maharashtra School

 शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी करिता मंगळवार, दिनांक 02 मे, 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करुन सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 11 जून, 2023 पर्यंत  ग्राह्य धरावा. (Summer Vacation in Maharashtra School)

म्हणजे शाळांना एकूण 41 दिवसाची सुट्टी मिळणार आहे

नवीन शैक्षणिक वर्ष

पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023 - 2024 मध्ये दुसरा सोमवार, दिनांक 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील.

(Maharashtra School New Academic Year 2023 - 2024)

 विदर्भातील शाळा 

तसेच विदर्भात जून महिन्यात जास्त तापमान असते, म्हणून जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक 26 जून, 2023 रोजी सुरु होतील, असे शासनाचे निर्देश आहे

त्यामुळे विदर्भातील शाळेला 56 दिवसाची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे

निकाल नियोजन

इ.1 ली ते इ. 9 वी व इ.11 वी चा निकाल दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. 

तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

 सुट्ट्यांचे समायोजन

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगो ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.

 शाळा संहिता नुसार सुट्ट्या

माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्टया 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन 

वरीलप्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचीत करावे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad