Nipun Bharat Abhiyan Download Final Test Question Papers

निपुण भारत अभियानांतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतिम चाचणी प्रश्नसंच डाउनलोड करा

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियान अंतिम चाचणी सूचना पत्र

#Nipun Bharat Abhiyan

महत्वाच्या सूचना :-

प्रत्येक मुल समजून घेणे व त्याला शिकण्यास मदत पुरविणे या उद्देशाने आपल्या वर्गात प्रवेशित मुल अध्ययनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेण्यासाठी वस्तुनिष्ठपणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतिम चाचणी पुढील सूचना विचारात घेऊन करावी.

1. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत भाषा, इंग्रजी व गणित विषयाच्या किमान क्षमता वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार अध्ययन सद्यस्थिती पडताळणी अंतिम चाचणीद्वारे करण्यात येत आहे.

2. विद्यार्थ्याची ही परीक्षा नसून भाषा, इंग्रजी व गणित विषयातील अध्ययन सद्यस्थिती पडताळणी आहे. 

3. प्रत्येक विद्यार्थ्याची वस्तुनिष्ठ नोंद प्रश्नसंचात दिलेल्या सूचनांप्रमाणे विषयनिहाय संबंधित इयत्तेच्या प्रपत्रात अचूक करावी.

4. निपुण भारत अभियान अंतर्गत इयता पहिली ते तिसरी मधील प्रत्येक बालकाने किमान अध्ययन क्षमता वर्षअखेर प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

5. अध्ययन स्थिती पडताळणी करताना बालकांना प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहित करा. आनंददायी वातावरणात अंतिम चाचणी व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

6. दिलेल्या प्रपत्रात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन स्थितीची नोंद त्याने प्रश्न संचातील सूचनांप्रमाणे ज्या

क्षमता प्राप्त केल्या आहेत त्या त्या क्षमतांमध्ये करावी.

7. इयत्ता निहाय प्रपत्र शाळास्तरावर शाळानिहाय प्रपत्र केंद्रस्तरावर केंद्रनिहाय प्रपत्र तालुकास्तरावर जतन करून ठेवावे व तालुकास्तर प्रपत्र एक प्रत जिल्हास्तरावर पाठविण्यात यावी.

8. प्रत्येक क्षमता स्वतंत्र आहे. त्यामुळे जेवढे विद्यार्थी ती क्षमता प्रश्नपत्रिकेतील निकषाप्रमाणे प्राप्त करत असतील त्यांची नोंद प्रपत्रावर अचूक करावी.

9. क्षमता प्राप्त विद्यार्थी व पटसंख्या जुळवण्याचा प्रयत्न करू नये.

10. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियानातील क्षमता विकासासाठी अंतिम चाचणी असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक आहे.

11. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वस्तुनिष्ठ झाल्याची खात्री शाळास्तरावर मुख्याध्यापक, केंद्र व तालुकास्तरावर पर्यवेक्षीय अधिकारी यांनी करावी.

12. संकलित माहिती विहित कालावधीत अचूक प्राप्त होण्यासाठी प्रपत्र काळजीपूर्वक भरावेत..

निपुण भारत FLN चाचणी


वर्ग पहिली ते तिसरी


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता 1 ला   Download
2.इयत्ता 2 राDownload
3.इयत्ता 3 राDownload

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad