CBSE Board Class SSC Exam Result Announce

CBSE चा दहावीचा निकाल जाहीर!

आपला निकाल पहा

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी मागील काही दिवसांंपासून या निकालाची वाट पाहात होते.दरम्यान विद्यार्थ्यांना https://cbseresults.nic.in/ 

या लिंकवर क्लिक करून त्यांच्या निकाल पाहाता येणार आहे.

यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 साठी नोंदणी केली आहे त्यापैकी 21,86,940 विद्यार्थ्यांनी देशभरात 10वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. CBSE ने दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी 10वी आणि 12वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात आली होती.

एकुण विद्यार्थी परीक्षेला बसले

CBSE 10वी बोर्ड परीक्षा 2023 साठी एकूण 21,09,208 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 20,93,978 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण उपस्थितांपैकी 19,76,668 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. 2023 मध्ये दहावीच्या एकूण 64,908 विद्यार्थ्यांनी 95% आणि त्याहून अधिक गुण मिळवले, तर 2,36,993 विद्यार्थ्यांनी 90% आणि त्याहून अधिक गुण मिळवले.

येथे देखील पाहाता येईल निकाल

10 वीचा निकाल डिजीलॉकर, उमंग अॅप आणि अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in 

वर देखील पाहाता येणार आहे. तसेच विद्यार्थी त्यांचा निकाल डाऊनलोड देखील करू शकतात.

CBSE 10th Result 2023

 ऑनलाइन कसा पहाल?

cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला किंवा त्यांची वेबसाइट

 cbseacademic.nic.in ला भेट द्या.

लँडिंग पेज / होमपेजवर, CBSE 10 वी निकाल 2023 लिंक उघडा.

आवश्यक माहितीनुसार आपले लॉगिन तपशील इंटर करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad